मुंबई: उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी डीम लाईट करुन असं एका बेडरुमध्ये बसणं योग्य नाही. दोन पुरुष असे डीम लाईटखाली एकत्र बसतात हे चांगलं लक्षण नव्हे. त्यांचा व्हिडिओवर हा 18+ कॅटेगरी असल्याचं लिहिलं पाहिजे अशी जहरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर केली आहे.
संजय राऊत यांनी उद्धव यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर पत्रकारांनी आज पावसाळी अधिवेशनात नितेश राणे यांना प्रश्न विचारले, त्यावर प्रतिक्रिया देताना या मुलाखतीचा व्हिडिओ म्हणजे कलानगरमधील बार्बी मुव्ही असा टोला नितेश राणे यांनी लगावला. ते म्हणाले, मला कुठली मुलाखत ठावुक नाही, त्या बार्बी मुव्हीबद्दल मी ऐकतोय. मला वाटलं कलानगरमधला मराठी बार्बी मुव्ही रिलिज झाले आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांचा कामगार हा फक्त आग लावायची आणि काड्या टाकायची कामे करित असतात. अजित पवार यांनी त्यांचे विधानसभेत वाभाडे काढले तरी निर्लज्जासारखे ते अजित पवार यांची स्तुती करत होते. हा फक्त महायुतीत काड्या टाकण्याचा प्रयत्न असून तो यशस्वी होणार नाही असे वक्तव्य नितेश राणे यांनी केले.
संजय राऊत यांचा समचार घेत नितेश राणे यांनी संजय राऊत या उद्धव ठाकरे यांच्या पगारी कर्मचाऱ्याला आमदार असण्याचा विसर पडला आहे. त्याने विधानसभेत यावे आणि लोकांच्या समस्या सोडवाव्यात विकास कामांसाठी सरकारला धारेवर धरावे. पण ते सोडून ते उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात वेळ वाया घालवत आहेत, असे म्हटले.
नितेश राणे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांची मंगलप्रभात लोढा यांच्या पालिकेतील चेंबरविरोधातील टीकेला म्याव म्याव म्हणत महाविकास आघाडीच्या काळात काढलेला जीआर दाखवला ज्यात तात्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांना मुंबई महानगरपालिकेचा बंगला वापरण्यासाठी देण्यात आल्याचे म्हटले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडी काळात मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुंबई महानगरपालिकेत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जे दालन सुरु केले त्यामुळे आदित्य ठाकरे यांना मिर्ची लागली आहे. त्या विरोधात गेले तीन दिवस त्यांची म्याव म्याव सुरु आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार असताना तात्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांना मुंबई पालिकेचा बंगला वापरण्यासाठी दिला होता. आम्ही जे दालन घेतले आहे ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी घेतले आहे पण तो बंगला वसुली आणि टक्केवारीसाठी वापरला जात होता. बहुदा त्यावेळी वसुली करण्यासाठी खोली छोटी पडत असावी म्हणून थेट बंगलाच दिला. असा घणाघाती आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…