Index Correction : ‘निर्देशांकाला करेक्शनची प्रतीक्षा’

Share
  • गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण

शेअर बाजाराची तेजी या आठवड्यात देखील कायम राहिली. मागील सलग काही आठवड्यात झालेल्या तेजीनंतर या आठवड्यात निर्देशांकांनी पुन्हा एकदा मागील काही आठवड्यांपूर्वी तयार केलेला उच्चांक मोडत नवीन उच्चांक नोंदविला. चार्टनुसार निर्देशांक निफ्टी, बँकनिफ्टी आणि सेन्सेक्स हे सर्व निर्देशांक तेजीत असून निफ्टी ही २०,००० या मॅजिकल आणि सायकोलॉजीकल अंकापासून केवळ २५० अंकांनी दूर आहे.

मागील आठवड्यात निफ्टीने १९९९१ हा उच्चांक नोंदविला आहे. सलग ४ आठवडे निर्देशांकात मोठी वाढ झालेली आहे आणि मध्यम मुदतीच्या चार्टकडे पाहता असे लक्षात येईल की शेअर बाजारात २० मार्च २०२३ नंतर तेजीला सुरुवात झाली, त्यावेळी निफ्टी जवळपास १७००० अंकांवर होती. त्यानंतर केवळ ४ महिन्यांत ३००० अंकांची वाढ केवळ निफ्टीमध्येच झालेली आहे. त्यामुळे पुढील काही काळात मोठे करेक्शन येणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये निफ्टी १८५०० ते १८८०० पर्यंत येणे अपेक्षित आहे. त्यामुळे आत्तापर्यंत अल्पावधीत झालेली मोठी तेजी आणि येऊ शकणारे करेक्शन लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

सध्या मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची गती तेजीची आहे. त्यामुळे टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीत असणाऱ्या शेअर्समध्ये अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच तेजीचा व्यवहार करता येईल. अल्पमुदतीसाठी कॅनफिन होम्स, आयसीआयसीआय बँक, अशोक लेलँड यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. मी माझ्या ८ मे च्या लेखात अल्पमुदतीचा विचार करीता “स्टार सिमेंट” या शेअरने १२४ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत टेक्निकल अॅनालिसिसनुसार तेजीची दिशा दाखविलेली आहे. त्यामुळे आज १२७ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये अल्पमुदतीसाठी खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकेल, हे सांगितलेले होते.

आपण सांगितल्यानंतर मागील आठवड्यात “स्टार सिमेंट” या शेअरने १५३.९० रुपये हा उच्चांक नोंदविला. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास आपण सांगितल्यानंतर केवळ दोन महिन्यांत या शेअरमध्ये २१ टक्के इतकी वाढ झालेली आहे. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून सोने ५८,९०० या पातळीच्यावर आहे. तोपर्यंत सोन्याची दिशा तेजीची राहील. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १९,५५० ही महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत ही पातळी तुटत नाही, तोपर्यंत अल्पमुदतीत निफ्टीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. मी मागील लेखात मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निफ्टीमध्ये तेजीची रचना तयार झालेली असून इथून पुढे निफ्टीमध्ये आणखी ५०० ते ८०० अंकांची महातेजी होणे अपेक्षित आहे, हे सांगितलेले होते. मी सांगितल्यानंतर एकाच आठवड्यात निर्देशांक निफ्टीमध्ये ३०० अंकांची वाढ झालेली आहे. या आठवड्यात निफ्टीने १९,९९१ हा नवीन उच्चांक नोंदविला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या करेक्शनमध्ये कोणते शेअर्स घ्यायचे, याचा विचार करून त्यानुसार आखणी करणे आवश्यक आहे. कोणतेही मोठे करेक्शन हे केवळ एक दोन आठवड्यात येत नसते आणि करेक्शन एकदम पूर्ण होत नसते. तेजी आणि मंदी होत कोणतेही करेक्शन येते. त्यामुळे पुढील काळात निर्देशांकाच्या प्रत्येक मोठ्या घसरणीत दीर्घमुदतीच्या शेअर्सचा विचार करता येईल.

(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)

(samrajyainvestments@gmail.com)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले जखमी

मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…

1 hour ago

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

9 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

10 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

10 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

10 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

11 hours ago