मुंबई : राज्यात पावसाने माजवलेल्या हाहाकारामुळे (Heavy rainfall) अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या आगमनाने आनंदलेला शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला (Vidarbha and marathwada) तर याचा जोरदार फटका बसला आहे. या प्रश्नाबाबत विरोधकांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यावर शासनाकडून तातडीने निर्णय घेण्यात आला असून याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानपरिषदेमध्ये निवेदन सादर करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पाच हजार ऐवजी १० हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुर्घटनेचा प्रसंग घडला तर ताबडतोब त्या ठिकाणी धान्य पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांना धान्य शिजवणं शक्य नसेल त्यांना शिजवलेले धान्य बंद पॅकेट्समधून वाटण्यात येईल. तसेच पुराच्या ठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छता करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
अजित पवार म्हणाले की, २३ जुलै रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. यवतमाळ, बुलढाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले होते. अशा ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले आहे. याठिकाणी मंत्र्यांनी भेटीही दिल्या आहेत. वायुदल, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) यांची मदत घेऊन अनेक लोकांना वाचवण्यात आले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावले आहे. तसेच जिल्ह्यातील पिकांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…