MNS workers vandalise toll plaza : टोलनाका प्रकरणावर अमित ठाकरे म्हणतात, 'साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे...

स्मितहास्य करत दिली अशी प्रतिक्रिया....


नाशिक : राज ठाकरे (Raj Thackarey) यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackarey) आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी काल अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Highway) प्रवास करत असताना सिन्नर येथील नाक्यावर त्यांचा ताफा अर्धा तास थांबवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. टोल नाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी तसेच गैरवर्तणुकीमुळे ही तोडफोड केल्याचे मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी सांगितले. नाशिकला पोहोचल्यानंतर अमित ठाकरेंना या तोडफोडीबद्दल कळलं, असं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या घटनेवर 'साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला', अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत दिली आहे.


ते म्हणाले, रात्री साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर दिवसभर बरोबर असलेल्या सिक्युरिटीला शिर्डीलाच थांबवून मी माझ्या कामानिमित्त नाशिकला निघालो. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे जाताना सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली. मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीलाच थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवण्यात आली.


पुढे ते म्हणाले, गाडीला फास्टॅग असतानाही टोलनाक्याचा रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं असता आमचे काही इश्यूज आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे, असं अमित ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ते म्हणाले, साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक ॲड झाला.



पोलिसांचं म्हणणं काय ?


दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, "अमित ठाकरे यांचा फास्टॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. पण पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांना प्रकार नीट समजावून सांगितला. त्यानंतर कार्यकर्ते कोणताही गोंधळ न घालता तिथून निघाले. टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आम्ही त्यानंतर इथे दोन तास होतो. पण अचानक रात्री अडीच वाजता काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा टोलनाक्यावर आलो. पण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :