justin vicky death: २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्न करत होता, मानच मोडली!

बाली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियामधील ३३ वर्षीय फिटनेस इन्फ्लुअन्सर जस्टिन विकी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिममध्ये २१० किलो वजनाचा बारबेल उचलत असताना मानेमध्ये दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेच्या दिवशी जस्टिन इंडोनेशियातील बाली येथील पॅराडाईज जिममध्ये व्यायाम करत होता.


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जस्टिन विकी बाली येथील पॅराडाईज जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॉट प्रेस (खांद्यावर वजन घेऊन उठाबशा काढणे) करताना दिसत आहे. स्क्वॉट मारण्यासाठी तो खाली बसल्यानंतर पुन्हा उभा राहू शकला नाही. यावेळी त्याच्या खाद्यावर सुमारे २१० किलो वजनाचा बारबेल होता. तो बारबेल जस्टिनच्या मानेवर पडला आणि गंभीर दुखापत झाली.



जस्टिन विकी हा २१० किलोग्रॅम वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. या अपघातामुळे जस्टिन विकीची मान मोडली तसेच हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्या महत्त्वाच्या स्नायूंमध्ये गंभीर दुखापत झाली.या घटनेनंतर जस्टिनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. येथे जस्टिनवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली, पण शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच फिटनेस ट्रेनर जस्टिन विकीचा दुर्दैवी मृत्यू झाला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Smruti Mandhana | अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९