Rahul Kanal : आदित्य ठाकरेंचे खास राहुल कनाल मोर्चाच्याच दिवशी शिवसेनेत

खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं होतं सूचक वक्तव्य


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ठाकरे गटाला लागलेली गळती कायम आहे. ठाकरे गटाच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतील कोअर कमिटीचे सदस्य व निकटवर्तीय असलेले राहुल कनाल देखील मोर्चाच्याच दिवशी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


राहुल कनाल यांनी महिन्यापूर्वीच युवासेना कार्यकारिणीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप सोडला होता. शिवसेनेत येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राहुल कनाल युवासेनेत नाराज असल्याची चर्चा होती. पक्षातील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल बाहेर पडल्याची चर्चा आहे.



ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार


या सगळ्याबाबत जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास दररोज वाढतोय. नवी माणसं रोज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडली जात आहेत” अशी सूचक प्रतिक्रिया दिली होती. तर दुसरीकडे “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर म्हणाले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या मोर्चाच्या दिवशी साथीदारांनीच साथ सोडल्याने पक्षाला मोठा खड्डा पडला आहे.



नितेश राणेंनी उडवली खिल्ली


दरम्यान, यावर भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विटद्वारे 'हमारी अधुरी कहानी' चित्रपटाचे पोस्टर व सोबत आदित्य ठाकरे व राहुल कनाल यांचा मिठी मारतानाचा फोटो अशी सूचक पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.






हा चित्रपट १ जुलैला प्रदर्शित होत आहे तेव्हा पाहायची संधी गमवू नका असंही या ट्विटद्वारे नितेश राणे म्हणाले आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली