नागपूर : राज्यभरातून प्रेमाला नकार दिल्याने मुलीचा जीवच घेणा-या विकृत तरुणांच्या संतापजनक घटना समोर येत असतानाच आता नागपुरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीला मेसेज करु नकोस असं धमकावणा-या बॉयफ्रेण्डचा प्रेयसीच्या एका मित्राने थेट खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी २९ जूनला घडली. यात हत्या झालेल्या तरुणाचे नाव श्रेयांश पाटील असून अमित मेश्राम असं आरोपीचं नाव आहे.
आरोपी अमितने आपल्या गर्लफ्रेण्डला स्तुती करणारे मेसेज पाठवल्याने श्रेयांश संतप्त झाला होता व अमितला मेसेज न करण्याची ताकीद दिली होती. याबद्दल चीड येऊन अमितने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन श्रेयांशवर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करुन आरोपी तिथून फरार झाले. श्रेयांशला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उपनिरीक्षक प्रदीप कायटे यांच्या नेतृत्वाखाली जरीपटका पोलिसांच्या पथकाने काही तासात अमित मेश्रामसह तीन आरोपींना अटक केली. आरोपींमधील दोन जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता. परंतु इन्स्टाग्राम मेसेजवरुन वाद झाल्याने हे हत्याकांड घडलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.
श्रेयांश व अमित यांची एका तरुणीसोबत मैत्री होती, तर श्रेयांश हा त्या तरुणीचा प्रियकर होता. काही दिवसांपूर्वी अमितने तरुणीची स्तुती करणारे काही मेसेज तिला इन्स्टाग्रामवर पाठवले. या मेसेजची स्टोरी तरुणीने इन्स्टाग्रामवर शेअर केली. हे पाहून तरुणीचा प्रियकर श्रेयांश चिडला व त्याने अमितला इन्स्टाग्राम मेसेजद्वारे आपल्या प्रेयसीला मेसेज न करण्याबाबत धमकावले. यावरुन त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता आणि तो वाढत गेला. अमितला या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने त्याने चर्चा करण्यासाठी श्रेयांशला बुद्ध विहाराजवळ बोलावून घेतले.
श्रेयांशलाही धोका असल्याचे कळल्याने त्याने सोबत चाकू ठेवला होता. बुद्ध विहाराजवळ अमित आपल्यासोबत आणखी दोन मित्रांना घेऊन आला होता व त्यांनी श्रेयांशसोबत झटापट केली. या झटापटीत अमितने लोखंडी रॉडने श्रेयांशवर हल्ला केला. श्रेयांशने चाकू काढताच दोन्ही मित्रांनी चाकू हिसकावून घेतला व श्रेयांशला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. श्रेयांशचा मात्र उपचारादरम्यानच मृत्यू झाला.
दरम्यान श्रेयांश पाटील हा जरीपटका परिसरातील एका कापडाच्या दुकानात कामाला होता. तर अमित मेश्रामवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वडील गणपत मेश्राम देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या संपूर्ण घटनेमुळे राज्यात विकृती विकोपाला गेल्याचे चित्र आहे. गुन्हेगारी वाढत असून यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…