प्रहार    

Wadala Pratipandharpur : आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात भाविकांची गर्दी

  211

Wadala Pratipandharpur : आषाढी एकादशीनिमित्त वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात भाविकांची गर्दी

सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज


मुंबई : आज आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. पंढरपुरात वारकर्‍यांची मंदिराबाहेर तोबा गर्दी उसळली आहे. ज्यांना पंढरपुरात जाणे शक्य नाही असे लोकदेखील महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेत आहेत. त्यातच आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर (Wadala Pratipandharpur) समजल्या जाणार्‍या विठ्ठल मंदिरात विठूमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.


आज सकाळी वडाळ्याच्या प्रतिपंढरपुरात महापूजा पार पडली आणि तेव्हापासून लांबच्या लांब रांगा लावून भाविक दर्शनासाठी सकाळपासूनच या ठिकाणी आले आहेत. या विठ्ठल मंदिरातील प्रमुख गाभार्‍याला फुलांची सजावट करण्यात आली असून विठ्ठल-रखुमाईला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे. सुंदर फुलांची आरास, दिवे, माळा यासह मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज करण्यात आले आहे. इथे भजन म्हणणार्‍या मंडळींमुळे तसेच भाविकांच्या उत्साहामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व मंगमलमय झाले आहे.



मंदिर प्रशासनाकडून येणार्‍या भाविकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणाले की,'मुंबईतील लोक वडाळ्यातील प्रतिपंढरपूरला येतात, याचं कारण असं की कामामुळे ते पंढरपूरला जाऊ शकत नाहीत. ४०० वर्षांपूर्वी पांडुरंगाची मूर्ती तुकाराम महाराजांनी स्वतः या ठिकाणी स्थापन केली आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांच्या मनात या ठिकाणाबद्दल श्रद्धा आणि विश्वास बसलेला आहे, म्हणून ते नेहमीप्रमाणे इथे येतात'.



काय आहे वडाळ्यातील विठ्ठल मंदिरामागचा इतिहास ?

हे विठ्ठल मंदिर ४०० वर्षांपूर्वीचे असून पूर्वी वडाळा मिठागरांसाठी ओळखले जायचे. इथे राहाणारे बहुतेक व्यापारी मिठाचा व्यापार करायचे. एक दिवस काम करताना या मिठागरात त्यांना विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी ही गोष्ट पंढरपूरला जाऊन तुकाराम महाराजांना सांगितली. तेव्हा महाराजांनी या मूर्तीची त्याच जागी स्थापना करण्यास सांगितले. तेव्हा येथील व्यापाऱ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या मंदिराची स्थापना केली, अशी यामागची कहाणी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची