मुंबई : आज आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झाले आहे. याच दिवशी बकरी ईदसुद्धा (Bakari Eid) साजरी केली जाणार आहे. मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देता दुसऱ्या दिवशी देण्याचा आदर्श निर्णय राज्यातील मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. तर जळगावच्या अमळनेर शहरात तर यंदा कुर्बानीच दिली जाणारा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लीम बांधवांकडून घेण्यात आला आहे.
सोशल मीडियावरील वादग्रस्त मेसेजच्या कारणावरून राज्यात काही समाजकंटक तणाव निर्माण करत असताना दुसरीकडे राज्यभरातील अनेक गावांमधील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यंदा आषाढी एकादशी व बकरी ईदचा सण २९ जून या एकाच दिवशी आला आहे. त्यामुळे या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील अनेक गावातील मुस्लिम बांधवांनी घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. त्याऐवजी ३० जून रोजी कुर्बानी देण्यात येईल, असे शांतता समितीच्या बैठकीतून जाहीर केले जात आहे.
‘एकादशीच्या दिवशी उपवास करून सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना केली जाते. बकरी ईदलाही आपण पैगंबरांजवळ हीच मागणी करतो. मग या दिवशी पशुहत्या करीत आपण काय साध्य करतो? यंदा एकादशी आणि बकरी ईद एकत्र आल्याने या दिवशी पशुहत्या टाळणे गरजेचे आहे,’ असे मत नगर जिल्ह्यातील निघोज येथे झालेल्या शांता समितीच्या बैठकीत डॉ. रफिक सय्यद यांनी व्यक्त केले. त्याला सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिल्याने या गावांचेही कौतुक होत आहे.
नगर जिल्ह्यातील नेवासे, घोडेगाव, शेवगाव, श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी, विसापूर, मढेवडगाव, श्रीरामपूर, बेलापूर, जामखेड आदी गावातील मुस्लिम बांधवांनीही असाच निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारी राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूर शहर व सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील १०० गावे, मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावे व करमाळा, वैराग या शहरांनीही शुक्रवारी कुर्बानी देण्याचे ठरवले आहे.
मराठवाड्यातील २१८, तर विदर्भातील ८० गावे
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, धाराशिव जिल्ह्यातील २१८ गावांतील मुस्लिम बांधवांनीही बुधवारी कुर्बानी न देण्याचा एकमुखी ठराव केला. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात ३३ गावे, यवतमाळचे चार तालुके, वाशिमच्या ४७ गावांनीही हा आदर्श कायम ठेवला आहे. त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या जवळच्या असलेल्या छोट्या पंढरपूरच्या आसपासच्या गावांनी असाच निर्णय घेतला होता. या निर्णयाचे कौतुक झाले होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…