
मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. अजित पवारांसोबतचा पहाटेचा शपथविधीमध्ये शरद पवारांच्या (Sharad Pawar) मर्जीने झाला होता पण पवारांनी ऐनवेळी माघार घेतली, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला होता. याला पटलवर करताना शरद पवार यांनी, आम्ही सरकारला पाठिंबा देणार होतो, पण दोन दिवसआधीच मी माघार घेतली होती. माझा पहाटेच्या शपथविधीला पाठिंबा होता, तर दोन दिवसांत सरकार का कोसळलं ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांचं शेवटी सत्य बाहेर आलं, मला याचा अतिशय आनंद झाला, उरलेलं अर्धसत्य मी बाहेर काढीन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवार साहेबांना शेवटी सत्य सांगावं लागलं, याचा मला अतिशय आनंद आहे. मी जी गुगली टाकली, त्यामुळे त्यांचं सत्य बाहेर आले. पण ते अर्धच सत्य आहे. उरलेले सत्य मी बाहेर काढेन. त्यांच्या गुगलीमुळे मी क्लीनबोल्ड व्हायच्या ऐवजी त्यांचे पुतणे अजित पवारच क्लीन बोल्ड झाले आहेत. अजून अर्धसत्यच बाहेर आलेय, उरलेले सत्य लवकरच बाहेर येईल, माझ्या दुसऱ्या गुगलीने उर्वरित सत्य बाहेर येईल, असे देवेंद्र पडणवीस म्हणाले.