Fadanvis Vs Pawar: शरद पवारांनीच डबलगेम केला! फडणीसांच्या आरोपाला भाजपच्या बड्या नेत्याचा दुजोरा

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव होता, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली एकप्रकारे आमचा डबलगेम केला. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढंच नव्हे तर 'भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण 'शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.


फडणवीस म्हणाले, शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला,  असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.


दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला भाजपच्या आणखी एका बड्या नेत्यानेही दुजोरा दिला आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते म्हणाले, फडणवीस यांनी सांगितलेले १०० टक्के खरे आहे. भाजप - राष्ट्रवादीची आघाडी फायनल झाली होती. शरद पवारांनी पालकमंत्री व जिल्हेही ठरवले होते, असे त्यांनी म्हटले आहे.


मुनंगटीवारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जातील असे आमच्या मनातही आले नव्हते. कारण आम्ही एकत्र लढलो होतो. पक्षाने मोठ्या मनाने त्यांना जागाही दिल्या. आम्ही आमच्या पक्षातून त्यांना उमेदवार दिला होता. साताऱ्यातील भाजपचा उमेदवार हा शिवसेनेचा म्हणून जाहीर केला. कोणत्याही राजकीय पक्षात असे होत नाही. पण आम्ही ते केले, असे मुनगंटीवार म्हणाले.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा