मुंबई : शेजारी रहात असतानाही अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या भावाने माय-लेकीवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार देवनार परिसरात घडला आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर तीची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जोडप्यांना अटक केली आहे.
देवनार पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार अंजली भोसले यांनी म्हटले आहे की, कृष्णा पवार या व्यक्तीचा भाऊ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला राहतो, त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कारही पार पडले. तक्रारदार भोसले यांचे कुटुंब मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शेजारीच राहतात, पण ते मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत.
याचा राग मनात धरुन कृष्णा पवार याने अंजली भोसले यांच्या आईवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी अंजली यांच्या बहिणीने आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या कृष्णाने तिलाही धारदार चाकूने अनेकदा भोसकले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई यामध्ये गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी कृष्णा पवार याला अटक केली असून त्याची बायको आणि या हल्ल्यामध्ये सहभाग असलेल्या दुसऱ्या एका दाम्पत्याला देखील ताब्यात घेतले आहे. एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार हत्येचा आणि कलम ३०७ नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…