मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियन (Disha salian) यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, या प्रकरणाची जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती. मात्र, नंतर काही लोकांनी सांगितले की, त्यांच्याकडे या प्रकरणाशी संबंधित काही ठोस पुरावे आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलून ते पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगितले आहे. सध्या उपलब्ध असलेले सर्व पुरावे बरोबर आहेत की नाही, हे तपासले जात आहे. तपास सुरू आहे, त्यामुळे त्याच्या निकालावर काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
यावर्षी जानेवारी महिन्यात सुशांत प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली होती. अभिनेत्याच्या शवविच्छेदनादरम्यान उपस्थित असलेले शवविच्छेदन कर्मचारी रूपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणला असता त्याच्या मानेवर आणि शरीराच्या काही भागावर जखमांच्या खुणा होत्या. रूपकुमार यांना याबाबत वरिष्ठांशी बोलायचे होते, मात्र त्यांनी याबाबत नंतर बोलू, असे सांगितले.
तसेच, शवविच्छेदन कर्मचार्यांनी सांगितले की सुशांतच्या मृत्यूच्या वेळी कूपर रुग्णालयात पाच मृतदेह होते. यातील एक मृतदेह व्हीआयपीचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय लिहायचे हे डॉक्टरांचे काम आहे, पण सुशांतचे फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की त्याची हत्या झाली आहे.
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…