Asian Kabbadi Championship: इराणला नमवत भारताची अंतिम फेरीत धडक

आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप स्पर्धा


सेऊल (वृत्तसंस्था) : बलाढ्य इराणला ३३-२८ असे नमवत भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप (Asia Kabbadi Championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी उपांत्य फेरीचा हा सामना झाला. भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा विजय आहे.


भारतीय संघाचा कर्णधार पवन सहरावतने दमदार चढाया मारत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने जमवलेल्या ३३ पैकी १६ गुण एकट्या पवनने मिळवले. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने सामन्याच्या ११व्या मिनिटाला चढाईत २ गुण मिळवत इराणला ऑलआऊट केले. त्यामुळे भारताने ११-५ अशी आघाडी घेतली. सहरावतच्या अप्रतिम चढायांच्या बळावर पहिल्या हापला चार मिनिटे शिल्लक असताना भारताची आघाडी १७-७ अशी होती. मध्यंतराला भारताकडे १९-९ अशी १० गुणांची आघाडी होती. इराणने पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हापच्या सुरुवातीलाच इराणने भारताला ऑलआऊट केले. त्यामुळे २६-२२ असा अटीतटीचा सामना रंगला. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता. अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवालने दोन गुण मिळवले. अखेर भारताने ३३-२८ असा विजय मिळवला.


भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजायाकडे कूच केली आहे. आतापर्यंत भारताने सात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे. इराणने एक वेळा विजेतेपद पटकावला आहे. इराणने २००३ मध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Jorge Messi : लिओनेल मेस्सीच्या आयुष्यात मोठी शोककळा; वडील जॉर्ज मेस्सी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन

बुएनोस आयर्स: फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यावर मोठा आघात झाला आहे. मेस्सीचे वडील जॉर्ज

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Nashik : जपानमधील आशियाई मॅरेथॉन स्पर्धेत अक्षय लिलकेने रोवला भारताचा झेंडा, तीन किमी ‘कॅनोइंग’ रेसमध्ये पटकावले कांस्यपदक

Nashik : जपानमधील क्युटो शहरात सुरु असलेल्या सहाव्या आशियाई कॅनोइंग अँड कयाकिंग मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धेत

Women's Cricket : भारतावरुद्धच्या मालिकेत द. आफ्रिकेकडून ३ टी-२० सामन्यांची भर

जोहान्सबर्ग : पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी

Asia Cup : 'महिला टी-२०'चा २८ ऑगस्टपासून युएईमध्ये थरार, ५ सप्टेंबरला रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; आशिया चषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेने 'महिला टी-२० आशिया चषक २०२६' या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक गुरुवारी जाहीर

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची नवी इनिंग! निवृत्तीनंतर कोचिंग नाही, कॉमेंट्री नाही; आता करणार 'हे' मोठं काम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका आणि अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत