इंफाळ: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मणिपूरमधील दौऱ्याआधी थांबवण्यात आल्यानंतर त्यांनी आता हेलिकॅप्टरने चुरचंदपूर येथे जायचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी इंफाळपासून २० किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूरजवळ थांबवले होते. त्यानंतर ते इंफाळला परतले. राहुल चुरचंदपूर रिलीफ कॅम्पमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात असताना वाटेत हिंसाचार होऊ शकतो या कारणामुळे पोलिसांनी त्यांना थांबवल्याची माहिती आहे.
पोलिस अधिकारी म्हणाले की, बिष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही झाली. अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून हा ताफा बिष्णुपूर येथे थांबवण्यात आला
राहुल गांधी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत, तसंच विविध समाजाच्या नेत्यांना भेटणार आहेत. ते ३० जूनपर्यंत मणिपूरमध्येच असतील. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग यांनी सांगितले की, राहुल यांचे ज्येष्ठ नागरिक आणि इतर नेत्यांना भेटण्याचे नियोजन आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…