Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडी'आदिपुरुष'पेक्षा 'रावरंभा', 'चौक' आणि 'टीडीएम' मराठी चित्रपट 'लय भारी'!

‘आदिपुरुष’पेक्षा ‘रावरंभा’, ‘चौक’ आणि ‘टीडीएम’ मराठी चित्रपट ‘लय भारी’!

मुंबई : बहुचर्चित ‘आदिपुरुष’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी ‘रावरंभा’, ‘चौक’ आणि ‘टीडीएम’ या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली असल्याचे चित्र आहे.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होताच दोन दिवसात प्रेक्षकांनी चित्रपटाला नापसंती दर्शवली. पहिल्या दोन दिवसातच ‘आदिपुरुष’ची जादू प्रेक्षकांवरून उतरली आणि नेटकऱ्यांनी चित्रपटावर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्ववादी संघटना आणि न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त केली.

चित्रपटामधील कलाकारांच्या क्रेझमुळे पहिल्या दोन दिवसात चित्रपटाने प्रचंड कमाई केली. मात्र त्यानंतर प्रेक्षकांनी त्याला जमिनीवर आपटले. सुरुवातीच्या काही दिवसात आगाऊ बुकिंगचा फायदाही या चित्रपटाला झाला. मात्र नंतर परिस्थिती बदलली. काही ठिकाणी तर आदिपुरुषचे शो रद्द करावे लागले.

‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्या १२ दिवसात तब्बल २७८ कोटींचा गल्ला जमवला. यापैकी सर्वाधिक कमाई केवळ पहिल्या २ दिवसांची आहे. मात्र त्यानंतर आदिपुरुषच्या कमाईचा वेग मंदावला आणि चित्रपट फ्लॉपच्या यादीत येऊन बसला.

या सगळ्यात मराठी चित्रपटांनी मात्र चांगलीच बाजी मारली असून मराठी चित्रपटांनी आपली घौडदौड सुरूच ठेवली आहे.

‘रावरंभा’ या चित्रपटाने तीन आठवड्यात तब्बल ६ कोटी २५ लाखांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट मोठया चित्रपटगृहांमधून उतरला असला तरी तो टुरिंग टॉल्किजवार सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘चौक’ या राजकारणावर आधारलेल्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना चौकातील परिस्थिती दाखवली. या चित्रपटाने नुकताच चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे.

तर भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ बद्दल सांगायचं तर या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही अनेक ठिकाणी ‘टीडीएम’ आपली जादू चालवतोय. या चित्रपटाने खासकरून ग्रामीण भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने एकूण ३ कोटींहुन जास्तीची कमाई केली असल्याचं एका वेबसाइटने म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -