Maharashtra Update : आंबेनळी घाटात रात्री दरड कोसळली, वाहतूक ठप्प

Share

ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना

पोलादपूर : आंबेनळी घाटात (Ambenali ghat) दोन दिवसांपासून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र आंबेनळी घाटात रात्री मोठी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग दरीत गेला आहे. घटनास्थळी अद्यापही दरड कोसळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरडीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले आहे किंवा कसे हे मात्र कळू शकलेले नाही. दरडी काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.

ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या ठिकाणी दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम पोहोचली आहे. आंबेनळी घाट हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर पासून ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या मार्गावर कुंभरोशी ते पोलादपूरपर्यंत आहे. जावळीच्या घनदाट अरण्यात हा घाट येतो. हा राज्य महामार्ग क्र. ७२ असून एकूण ४० कि.मी. लांबीचा रस्ता आहे. घाटाची उंची सर्वसाधारणपणे ६२५ मी (२०५१ फूट) आहे.

रायगड पोलिसांचे पथक, पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. महाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता व पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे व कर्मचारी जेसीबी व अन्य साहित्य घेऊन घटनास्थळजवळ हजर आहेत. मात्र या ठिकाणी छोटे मोठे दगड खाली येण्याचा प्रकार सुरूच आहे. आंबेनळी घाटाबाबत तालुका व जिल्हा प्रशासन आज चर्चा करून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच महाडकडून पुण्याकडे जाणा-या वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींवर महाडचे महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. बनापुरे हेही लक्ष ठेवून आहेत.

कोकणातील आणि महाबळेश्वरातील पर्यटन वाढल्यामुळे या घाटात गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घाटातील रस्ता धोकादायक वळणाचा असल्याने अपघाताचे प्रमाणही बरेच वाढले आहे. या घाटात काही वर्षांपूर्वी कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला होता. त्या दरम्यान एक वगळता सर्वांचा दरीत कोसळून मृत्यू झाला होता.

ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना

दरम्यान, रायगड पोलिसांकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळली असल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. प्रवाशांनी ताम्हिणी घाटातून जाणाऱ्या मर्गाचा अवलंब करावा, अशी सूचना रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 minutes ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

60 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago