Bhaskar and Riddhi Khursunge : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांच्या घरात घुसून पुतणीवर हल्ला; शिवसेनेचा आमदार धावून आला मदतीला

राज्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत


मुंबई : मुंबईच्या (Mumbai) बोरिवली (Borivali News) पूर्वेतील अभिनव नगर परिसरात राहणा-या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे (Bhaskar Khursunge) व रिद्धी खुरसंगे (Riddhi Khursunge) यांच्या घरात घुसून अज्ञातांनी त्यांच्या पुतणीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल घडली. या हल्ल्यात पुतणी गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना माहिती मिळताच ते तात्काळ खुरसंगे यांच्या मदतीला धावून आले.

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी रुग्णालयात जाऊन रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीची भेट घेतली आणि तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, त्यांनी घडलेल्या धक्कादायक घटनेचा तपास करुन आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे व रिद्धी खुरसंगे यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घरात सोमवारी २६ जूनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी घुसून हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची पुतणी विथिका हिचा गळा आवळून तिच्या छातीवर पोटांवर आणि मांड्यांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
शिवसेनेची मान उंचावली

एकीकडे ठाकरे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेच्या मदतीला धावून गेल्याने शिवसेनेची मान उंचावली आहे. खरा शिवसैनिक कोणताही दुजाभाव न बाळगता थेट मदतीला धावून जातो, हे यातून दिसून आले.
राज्यात महिला सुरक्षित ?

या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज सकाळीच दर्शना पवार प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणा-या एका तरुणीवर तिच्या मित्राने एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार केला. त्यात कालच रिद्धी खुरसंगे यांच्या पुतणीवरील हल्ल्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी