Research Report : रॉकेलचा स्टोव्ह इतिहासजमा पण गॅसमुळे ‘या’ गंभीर रोगांचे प्रमाण वाढले

Share

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांचा धक्कादायक दावा

मुंबई : रॉकेलचा स्टोव्ह कधीच इतिहास जमा झाला असून आता सगळेजण एलपीजी सिलेंडरचा वापर घरात स्वयंपाकासाठी करतात. पेट्रोलियम गॅस द्रव स्वरूप म्हणून एलपीजी गॅस स्वयंपाक करणे सोपे झाले आहे. पण हे आपल्या आरोग्यासाठी अतिधोकादायक असल्याचा धक्कादायक दावा संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार, गॅस शेगडी पेटवल्याने त्या आगीसोबत आरोग्यासाठी हानिकारक असलेले किमान १२ धोकादायक वायु उत्सर्जित होत असतात. यामुळे दमा, कॅन्सर, ल्युकेमिया, मल्टीपल मायलोमा, नॉन-हॉजकिन लिम्फोमा, रक्तविकार आणि प्रजनन समस्यांचा धोका वाढू शकतो, असे संशोधकांच्या पथकाने म्हटले आहे. (Stanford University Research Report)

यामुळे आपले आरोग्य किती सुरक्षित आहे? असा प्रश्न उद्भवत आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, जेव्हा आपण गॅस शेगडी पेटवतो तेव्हा आपल्याला फक्त आग दिसते, परंतु प्रत्यक्षात आगीसोबत अनेक प्रकारची रसायने देखील उत्सर्जित होतात. त्यापैकी १२ हून अधिक रसायने आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आढळून आले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की ते तुमच्या आरोग्यासाठी सिगारेटइतकेच हानिकारक असू शकते. (How safe is LPG gas for health?)

एलपीजी गॅसमुळे होणारे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी संशोधकांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये (Journal Environmental Science and Technology) प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी बेंझिनसह गॅस स्टोव्हमधून उत्सर्जित होणारे किमान १२ धोकादायक वायु प्रदूषक ओळखले आहेत. बेंझिन हे एक रसायन आहे ज्याचा दीर्घकाळ संपर्क झाल्यास कर्करोग होऊ शकतो. केवळ स्टॉपमधूनच नव्हे तर बंद स्टॉपमधूनही बेंझिनचे उत्सर्जन होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांना आढळून आले आहे. हे सेकंड हँड स्मोकिंग सारखेच हानिकारक आहे.

पीएसई हेल्दी एनर्जीच्या (PSE Healthy Energy) संशोधकांनी कॅलिफोर्नियामधील १६ काउंटींमधील १५९ घरांमधून स्टोव्ह गॅसचे नमुने घेतले आणि ९९ टक्के नमुन्यांमध्ये बेंझिन आढळले. संशोधकांनी स्वयंपाकघराचा आकार, खोलीतील वायुवीजन पातळी, किती रसायने उपस्थित होते आणि स्टोव्ह बंद केल्यावर त्याची गळती होते की नाही यासारख्या घटकांच्या आधारे घरात बेंझिनमुळे होणाऱ्या आरोग्याच्या जोखमींचे मूल्यांकन केले.

परिणामांमध्ये असे आढळून आले की, स्टोव्हमधील बेंझिनचे घरातील प्रमाण कॅलिफोर्निया पर्यावरण संरक्षण एजन्सीने निर्धारित केलेल्या सुरक्षित एक्सपोजरच्या पातळीपेक्षा तब्बल सात पट जास्त होते.

संशोधकांचे म्हणणे आहे की, वेळोवेळी बेंझिनच्या संपर्कात आल्याने एखाद्या व्यक्तीला या रसायनामुळे ल्युकेमिया, मल्टीपल मायलोमा आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा सारख्या समस्या देखील होऊ शकतात.

संशोधकांचे म्हणणे आहे की कर्करोगाच्या जोखमीच्या बाबतीत बेंझिनच्या प्रदर्शनाची कोणतीही सुरक्षित पातळी नाही. परंतु बेंझिन हे एकमेव चिंताजनक रसायन नाही जे स्टोव्हमधून येते, संशोधनात असे दिसून आले आहे की अन्य विषारी वायु सुद्धा निघत असल्याने गॅस स्टोव्हमुळे घरातील वायू प्रदूषणाचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

संशोधक म्हणतात, आठपैकी एका मुलाला दम्याचा धोका

एलपीजी गॅस स्टोव्हमुळे आठपैकी एका मुलाला दम्याचा धोका असल्याचे आणखी एका अभ्यासात आढळून आले आहे. गॅस स्टोव्ह बंद असतानाही ते बेंझिन उत्सर्जित करत राहतात. लेखक एरिक लेबेल म्हणतात, जे धूम्रपान करतात त्यांच्यासोबत राहणाऱ्या मुलांना दम्याचा त्रास उद्भवतो. तशाच प्रकारे गॅस सिलेंडरमधून निघणा-या बेंझिनमुळे देखिल मुलांना दम्याचा त्रास उद्भवतो.

दरम्यान, जागतिक स्तरावर ज्या प्रकारे लोक एलपीजी गॅसवर अवलंबून आहेत, त्याचा वापर कसा कमी करता येईल, हा विचार करण्याची बाब आहे. तोपर्यंत स्वयंपाकघरात चांगले वायुवीजन सुनिश्चित करणे खूप महत्वाचे आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

4 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

5 hours ago