Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीKhatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीच्या फायनल राऊंडमध्ये पहिली एंट्री ‘या’...

Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीच्या फायनल राऊंडमध्ये पहिली एंट्री ‘या’ मराठमोळ्या चेहऱ्याची

मुंबई: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमात फायनलिस्ट कोण असणार याकडे मनोरंजनप्रेमींच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान या पर्वात ‘आपला माणूस’ शिव ठाकरे (Shiv Thakare) ‘खतरों के खिलाडी 13’चा पहिला फायनलिस्ट असणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पहिला फायनलिस्ट मराठमोळा शिव झाल्याच्या चर्चेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिव ‘बिग बॉस मराठी’चा विजेता होता. हिंदी बिग बॉस आणि रोडीजदेखील त्याने गाजवलं आहे. आता ‘खतरों के खिलाडी 13’ चा फायनल राऊंड गाजवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. फायनलमध्ये तो उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यासोबत स्टंटबाजी करताना दिसणार आहे. शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी 13’नंतर तो ‘रोडीज 19’मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -