कोल्हापूर : गडहिंग्लज येथील तरुण उद्योगपती तथा अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे (Santosh Shinde) यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येप्रकरणी शिंदे यांच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेली माजी नगरसेविका आणि पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. कोल्हापूर पोलिसांच्या टीमने दोघांना सोलापुरातून ताब्यात घेतले असून अन्य दोघांचा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोधाशोध सुरु आहे. माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि राहुल राऊत पोलिसांच्या ताब्यात असून ते सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये लपून बसले होते.
एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि आणि पोलिस अधिकारी राहुल राऊत यांनी त्रास दिल्याचं सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमधील उद्योजक संतोष शिंदे यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलासह आत्महत्या केली होती. संतोष पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर शुभदा पाटील आणि राहुल राऊत यांनी पलायन केलं होतं. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांच्या टीमने त्यांना सोलापुरातून ताब्यात घेतलं आहे.
शिंदे यांनी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येसाठी चौघांना दोषी धरावे असे म्हटले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी त्रास देणारी माजी नगरसेविका, पोलिस अधिकारी राहुल राऊत तसेच संतोष शिंदे यांच्याकडून साडेसहा कोटी रुपये घेतलेले पुण्यातील विशाल बाणेकर आणि संकेत पाटे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. या संदर्भातील फिर्याद संतोष यांचे नातेवाईक शुभम बाबर यांनी दिली. दरम्यान, संतोष शिंदे यांनी ज्या पद्धतीने आयुष्याचा शेवट केला ते पाहून अक्षरशः काळजाचा थरकाप उडाला. मुलाने अशा पद्धतीने शेवट केल्याने त्यांच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करावं लागलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…