Ashish Shelar : ‘मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन’

Share

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात पाणी तुंबल्यावरुन भाजप (BJP) आणि ठाकरे गटात (Thackeray Gat) चांगलेच राजकारण तापले आहे. ठाकरे गटाकडून नालेसफाईवर टीका करण्यात येत आहे तर भाजपचे नेते यावर आक्रमक होऊन आपली भूमिका मांडत आहेत. यातच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विटद्वारे आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली.

‘तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली’, असं म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात की चेरापुंजीची?

पुढे आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची एक व्हिडीओ क्लिप शेअर करत आशिष शेलार म्हणाले की, ‘म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता.’ यामुळे आदित्य ठाकरेंच्या आपल्या कार्यकाळाच्या वेळी ४०० मिमी प्रतितास पाऊस होत होता, तेव्हा मी, महापौर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो, या विधानाला आशिष शेलारांनी चपराक लगावली आहे.

इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन

आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, ‘यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर! मुंबईकर हो, दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना… इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन, वो काग़ज़ कि कश्ती, वो बारिश का पानी!’ या शब्दांत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

अमेरिकेत आर्थिक मंदीची लाट; सुमारे एक लाख भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याची भीती

वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…

2 mins ago

Hair Fall: केसगळती रोखायची असेल तर जरूर खा हे पदार्थ, हेअरफॉल होईल कमी

मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…

3 mins ago

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…

59 mins ago

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

5 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

6 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

7 hours ago