मुंबई : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई व पुण्यात टाकलेल्या छाप्यात घोटाळ्याशी (BMC Covid Scam) संबंधित एक महत्त्वाची डायरी ईडीच्या हाती लागली आहे. त्यात या घोटाळ्याशी संबंधित अनेक बड्या नेत्यांची व अधिकाऱ्यांची नावे असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, हा कोविड घोटाळा तब्बल ४ हजार कोटींचा आहे. त्यात अनेक महापालिका अधिकारी, उच्चपदस्थ सनदी अधिकारी व राजकारण्यांशी संबंध असणाऱ्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्यावर कंत्राटदारांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत साधल्याचा आरोप आहे.
ईडीने आदित्य ठाकरे व खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण व सुजीत पाटकर यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छापेमारीत अनेक महत्वाची माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई महापालिका मुख्यालय, भायखळा कार्यालय आणि महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीय जयस्वाल, माजी अधिकारी हरीश राठोड व माजी उपायुक्त रमाकांद बिरादार यांच्यासह १७ ठिकाणीही धाड टाकण्यात आली होती. सलग १७ तास झालेल्या या छापेमारीमुळे मुंबईत एकच खळबळ माजली होती.
या धाडसत्रात एका मध्यस्थाच्या घरी एक महत्त्वाची डायरी ईडीच्या हाती लागली. या डायरीत कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला किती लाच देण्यात आली, याचा विस्तृत तपशील नमूद आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
विशेष म्हणजे ज्या मध्यस्थाच्या घरी ही डायरी सापडली, त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचाही दावा केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी अधिकारी या डायरीतील माहितीच्या आधारावर कसून तपास करत आहे. कुणाला किती लाच मिळाली? त्यांची या घोटाळ्यात कोणती भूमिका होती? यासंबंधी चौकशी केली जात आहे. हे अधिकारी कोण आहेत? ते सेवानिवृत्त झालेत की अजूनही कर्तव्यावर आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या डायरीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
दरम्यान, कोविड घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांच्यात कार्यकाळात खरेदी विभागात हा घोटाळा झाला होता. त्यामुळे त्यांची चौकशी होणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…