IAS-IPS : आर्थिकदृष्ट्या वंचित तरुणांना आयएएस-आयपीएस होण्यासाठी बॉलिवूडचा 'हा' 'मसिहा' सरसावला!

मुंबई : अभिनय, समाजकार्य यातून नेहमीच सामान्य जनतेसाठी कायम हक्काने उभा असणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद! सामान्य माणसाचा 'मसिहा' ही अनोखी पदवी सोनू सूद ला मिळाली आहे. या अभिनेत्याने कोरोना महामारीच्या काळात असंख्य लोकांना मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असुरक्षितांना मदत देणे असो, बेघरांना कपडे आणि निवारा देणे असो किंवा जीव वाचवणार्‍या एअरलिफ्टचे सोबत आपुलकीने केलेली विचारपूस असो सोनू सूदने अथकपणे समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या अथक वचनबद्धतेमुळे त्यांना केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही त्याचा बद्दलचा आदर वाढला असून जगभरातून सोनूच्या कामाचं कायम कौतुक झालं आहे.


सूद चॅरिटी फाऊंडेशन (SCF) चे संस्थापक म्हणून सोनू सूद याने कायम समाजासाठी असंख्य काम केली. समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी आणि नवीन बदल घडवून आणण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केलं आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि आपत्ती निवारणावर या सगळ्यांवर लक्ष केंद्रित करून SCF च्या माध्यमातून सोनू ने लोकांचं जीवन बदललं आहे.


सूद चॅरिटी फाऊंडेशनने डिव्हाईन इंडिया युथ असोसिएशन (DIYA) आणि सरत चंद्र अकादमी यांच्या सहकार्याने 2023-24 या वर्षासाठी 'संभवम' सुरू करण्याची घोषणा सोनू ने केली आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या सगळ्या तरुणाईला समर्पित असणार आहे ज्यांना नागरी सेवा परीक्षांचे विनामूल्य ऑनलाइन IAS कोचिंग, मार्गदर्शन मिळणार आहे.


सोनू च्या या अनोख्या कार्याने जगभरात अनेक तरुण IAS अधिकारी घडणार आहेत. SAMBHAVAM चे उद्दिष्ट हेच आहे की समाजातल्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींसाठी नव्या संधी निर्माण करणे आहे. DIYA आणि सरत चंद्र अकादमीसोबत भागीदारी करून, SCF एक चांगला आणि मजबूत भारत निर्माण नक्कीच करतील यात शंका नाही!



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात