suicide : विनयभंगाची तक्रार दाखल असलेल्या 'त्या' रिक्षाचालकाची आत्महत्या

  108

रत्नागिरी : महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाची तक्रार दाखल असलेला व नुकताच जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. आपण दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केल्याचे तिने या पोस्टमध्ये नमूद केले. त्याची दखल घेत पोलिसांनी या तरुणीशी संपर्क साधून तिची तक्रार दाखल करुन घेतली व दीड तासात रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला शोधून अटक करण्यात आली. दोन दिवसाआधीच त्याला जामीन मिळाला होता.


आज शनिवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तो राहत असलेल्या साईदीप गृहसंकुल, शांतीनगर, नाचणे, या इमारतीच्या टेरेसवर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. तो पत्नी व दोन मुलांसह येथे राहतो. त्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता.


पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी, प्रभारी पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

चालत्या ट्रॅव्हल बसमध्ये एकाने घेतले पेटवून! जागीच मृत्यू... अन्य प्रवाशांची धावपळ

जालना: महाराष्ट्रातील जालना येथे चालत्या ट्रॅव्हल्स बसमध्ये एका ५० वर्षीय प्रवाशाने स्वतःवर पेट्रोल ओतून

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट