Patna Opposition Meeting : विरोधकांना चिंता मुलाबाळांची : चंद्रशेखर बावनकुळे

Share

आशिष शेलार व संदीप देशपांडे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

पाटण्यात आज विरोधी पक्षांची बैठक

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना खडबडून जाग आली आसून आज अकरा वाजल्यापासून ते बिहारमधील पाटण्यामध्ये (Patna Opposition Meeting) बैठक घेणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) नाव जगभर गाजत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षांना हे पाहवत नसल्याने ते आज एकत्र येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ‘विरोधकांना चिंता मुलाबाळांची’ असं म्हणत विरोधकांची खिल्ली उडवली. तर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) व भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पाटण्यात आजच्या बैठकीला उपस्थित राहणारे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

विरोधकांच्या बैठकीला लक्ष्य करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नरेंद्र मोदीजींनी आपल्या भाषणात म्हटलं की माझा सन्मान म्हणजे १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. एकीकडे पंतप्रधान भारताला उंची देण्याचं काम करत असताना दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. खरं तर विरोधकांचं त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्याकरता एकत्रीकरण सुरु आहे. सोनिया गांधींना राहुल गांधी मुख्यमंत्री हवे आहेत, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना पुढे आणायचंय, उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंची चिंता आहे, त्यामुळे विरोधकांनी जरी एकत्र मुठी बांधल्या तरी त्यांना मुलाबाळांची चिंता आहे म्हणून ते हे करत आहेत”, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.

आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर तिखट प्रश्नांची सरबत्ती

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट आव्हान दिलं. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? औरंगजेब की सावरकर? असे प्रश्न आशिष शेलारांनी उपस्थित केले आणि याच प्रश्नांची होर्डिंग्ज लावून ते उद्धव ठाकरेंना थेट सवाल करणार आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.

दुसर्‍याची गद्दारी आणि स्वतःची देशभक्ती : संदीप देशपांडे

ज्या मेहबुबा मुफ्तींनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं म्हणून तुम्ही आयुष्यभर टोमणे मारले, त्याच मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही आज बैठकीसाठी बाजूला बसणार आहात का? असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ दुसर्‍याने केली तर ती गद्दारी आणि स्वतः केली तर ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय कोणाची असू शकते? स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि दुसर्‍यांसाठी वेगळे निकष, असा टोलाही त्यांनी लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

32 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

60 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

2 hours ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

7 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

8 hours ago