Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Mumbai Police threat calls: मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरुच! यावेळी पुणंही बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai Police threat calls: मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमक्यांचे सत्र सुरुच! यावेळी पुणंही बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबई पोलिसांना (Mumbai Police) येणाऱ्या धमक्यांचे फोन (Threat calls) काही थांबण्याचं काही नाव घेत नाही. मुंबई पोलिसांना आज  सकाळी १० वाजता फोनवरून मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, अंधेरी, कुर्ला भागात उद्या म्हणजेच २४ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता बॉम्बस्फोट (Bomb Blast) करण्याची धमकी या फोन कॉलवरुन देण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीनं धमकीचा फोन करणाऱ्याला अटक केली आहे. या आरोपीचे वय २५ ते ३० वर्षाच्या दरम्यान असल्याची माहिती मिळते आहे. त्याला मुंबईत आणण्यात आलं असून कॉल करण्यामागील कारण समजलेलं नाही. आरोपीची वेगवेगळी नावं असून तो पोलिसांना त्याचं खरं नाव सांगत नसल्याचं समजत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, या आरोपीनं आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच, पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत. दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असं सांगितलं होतं. पोलीस तपासादरम्यान आरोपीनं हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचं तपासात समोर आलं आहे.

Comments
Add Comment