Ahmednagar Robbery : अहमदनगरमध्ये भल्या पहाटे व्यापार्‍याच्या घरावर सशस्त्र दरोडा

दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी


शेवगाव : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात सातत्याने खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आज अहमदनगरमधील शेवगाव (Shevgaon) येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा (वय ५५ वर्ष) यांच्या राहत्या घरावर आज २३ जूनला भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकल्याने खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाला. घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे.


गोपीकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भावजय पुष्पा हरिकिशन बलवा (वय ६५ वर्ष) या दोघांचा या दरोड्यामध्ये झालेल्या मारहाणीदरम्यान मृत्यू झाला, तर गोपीकिशन यांच्या पत्नी सुनिता बलदवा जखमी झाल्या आहेत. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे. व्यापारी आणि ग्रामस्थांनी ही बंदची हाक दिली असून पोलिसांनी तातडीने घटनेचा छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडेंनी व्यक्त केली नाराजी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली तसेच घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, "शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा," शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.



नेमके काय घडले?

दरोडेखोरांनी प्रथम गौरव बदलवा यांच्या घराला बाहेरुन कडी लावली व नंतर वेगळ्या मार्गाने गोपीकिशन बदलवा यांच्या घरात प्रवेश करुन झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर गजाने प्रहार केला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चोरी करताना पुष्पा बदलवा जाग्या झाल्याने त्यांनाही जीवे मारले. या घटनेत तीन चोरटे दुचाकी वाहनावरुन आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक बी. चंद्रकात रेड्डी, पो. नि. विलास पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि