Adipurush: नेपाळमध्ये आदिपुरुषसह सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी! आता 'या' गोष्टीवरुन वाद

काठमांडू:'आदिपुरुष' चित्रपटामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. नेपाळची राजधानी काठमांडू महानगरपालिकेने काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटांवर आजपासून बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. सीतेवरील तो वादग्रस्त संवाद काढून टाकल्याशिवाय चित्रपट प्रदर्शानाची परवानगी देण्यात येणार नाही असं काठमांडूच्या महापौरांनी म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटावर होणाऱ्या टीकेमुळे दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत ४०टक्के घट झाली आहे.


रविवारी, काठमांडूच्या महापौर बालेन शहा यांनी खोऱ्यातील सर्व चित्रपटगृहांना सोमवारपासून तेथे कोणताही हिंदी चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले. याबाबत अधिकृत घोषणा करताना त्यांनी एक ट्विटही शेअर केले आहे. यासोबतच यासंबंधीची पत्रेही सर्व चित्रपटगृहांना पाठवण्यात आली.










सीतेच्या जन्मस्थानावरून वाद


हा सगळा वाद चित्रपटात सीतेला भारताची कन्या म्हणण्यावरून झाला आहे. नेपाळ सेन्सॉर बोर्डाने यावर आक्षेप घेतला. सीताजींचा जन्म भारतात नसून नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सीतेच्या जन्मस्थानाची चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की सीतेचा जन्म नेपाळमध्ये नसून बिहारमधील सीतामढीमध्ये झाला आहे.



Comments
Add Comment

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा