Nitesh Rane: वरळीत पेंग्विन आणि पेंग्विनच्या नाईट पार्टनरला जुने-प्रामाणिक कार्यकर्ते कंटाळले!

  108

मुंबई: वरळीतील मतदारसंघात आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) प्रेझेंटेशन देतील काय? तिकडच्या मच्छिमार बांधवांसाठी काय केले याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मुळात वरळीचा आगामी विधानसभा निवडणूकीचा उमेदवार कोण आहे याचीच आम्हाला माहिती द्या अशा शब्दांत, भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) उबाठा गटाची पोलखोल केली. वरळीमध्ये पेंग्विनचा नाईट पार्टनर याचे काय धंदे सुरु आहेत हे आम्हाला चांगलच माहिती आहे या शब्दांत नितेश राणे यांनी सचिन आहिर यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे २०२४ ची विधानसभा निवडणूक (2024 Assembly Elections) आदित्य ठाकरे शिवडी विधांनसभेतून लढणार आहेत असा गौप्यस्फोट करत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर त्यांचे किती पोस्टर फाडले गेले याचीही माहिती घ्या असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला. त्याचसोबत तेथील सुनील शिंदेसारख्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची कशी पिळवणूक सुरु आहे. तसेच किशोरीताई पेडणेकर सुद्धा सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत हे गौप्यस्फोटही नितेश राणे यांनी केले.



उबाठा गटाच्या झालेल्या शिबिराचा यांनी त्यांच्या खास शैलीत समचार घेतला. ते म्हणाले, मुळ शिवसेना ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली मोकळा श्वास घेते आहे. ओसाड गावचे पाटील उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली त्यांना हे कचरा म्हणतात. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूची राऊत, परब, देसाई ही जी कार्टी आहेत त्यांनी आज पक्षाची ही अवस्था करून ठेवलीय. यांच्याकडे नाव नाही. जे मशाल चिन्ह आहे ते केवळ अंधेरी मतदारसंघाच्या निवडणूकीपुरतेच वापरायचे असा निवडणूक आयोगाचा आदेश होता. तो गद्दार दिन साजरा करण्यापेक्षा २८ नोव्हेंबर २०१९ हा धर्मांतर दिन म्हणून साजरा करा. शिवाजीपार्कवर या दिवशी उद्धव ठाकरे यांचा सुन्ता करुन त्यांचे धर्मांतर करण्यात आले. काल झालेल्या शिबिरात टोपी काढून अल्पसंख्यांकांना बसवण्यात आलं होतं. पैसे देऊन कार्यकर्त्यांना आणलं होतं. त्यापैकी जास्त गर्दी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती.



राजाराम राऊत यांच्या मुलाला किंमत आहे का?


यावेळी नितेश राणे यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधणाऱ्या राजाराम राऊत या मुलाला किंमत आहे का असा सवाल विचारत. संजय राऊत यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कसा पाणउतारा होतो हे सांगितले. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हे संजय राऊत यांना किंमत देत नाहीत हे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याआधी संजय राऊत यांचा अजित पवार, नाना पटोले खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच कसा पाणउतारा केला याची आठवण राऊत यांना करुन दिली.



प्रकाश आंबेडकर यांच्यावरही निशाणा


प्रकाश आंबेडकर हे औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन पुष्पवर्षाव करुन आले. हिंदूंना सर्वात जास्त त्रास देणारा औरंगजेब होता. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करता. त्या प्रकाश आंबेडकरांना बोलण्याची तुम्हाला हिम्मत आहे का? बाळासाहेबांचं हिंदूत्व तुमच्यात असल्याचं तुम्ही सांगता. एवढा हिंदुत्वाचा तुम्हाला कळवळा आहे मग प्रकाश आंबेडकर यांना जाब विचारणार का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही