Friday, June 13, 2025

Adipurush : ‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यावर लगेच झाला लीक!

Adipurush : ‘आदिपुरुष’ रिलीज झाल्यावर लगेच झाला लीक!

ऐकलंत का! : दीपक परब


या वर्षाचा एक बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच तो काही वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला. त्यामुळे निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. या चित्रपटात प्रभासने प्रभू श्री रामाची भूमिका साकारली असून क्रिती सेनन हीने जानकीची भूमिका साकारली आहे. ओम राऊत याने दिग्दर्शित केलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. ‘आदिपुरुष’ एचडी प्रिंटमध्ये पायरेटेड वेबसाइट्स तमिलरॉकर्स, फिल्मझिला, मूव्हीरुल्झ आणि अनेक ऑनलाइन पायरसी वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला. हा चित्रपट केवळ डाऊनलोड करण्यासाठीही ऑनलाइन लीक झाला आहे. या चित्रपाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे, तर काहीजण चित्रपटाबाबत असमाधान व्यक्त करत आहेत. अशातच आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘जय श्री राम’ हे गाणं रिलीज झालं. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांनी केले असून मनोज मुंतशिर शुक्ला हे या गाण्याचे गीतकार आहेत. या चित्रपटातील ‘राम सिया राम’ हे गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Comments
Add Comment