Google Map Features : गुगल मॅप्सची 'ही' आगामी फीचर्स तुमचा प्रवास करतील अधिक सुखकर!

  96

गुगल मॅप्सची (Google Maps) नवी येणारी २ फिचर्स तुम्हाला आगामी काळात अत्यंत फायद्याची ठरणार आहेत. तसेच एक फीचर असे आहे जे नुकतेच आले आहे आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल...

ग्लान्सेबल डिरेक्शन्स (Glanceable directions)


गुगल मॅप्समध्ये हे फीचर काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल. ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर वापरुन युजर्स स्क्रीन लॉक असताना देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती फक्त फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध करून दिले जाईल.

हेही वाचा...


​अपडेट्स टु रिसेंट (Updates to Recents)


गुगल मॅप्सने आणखी एक फीचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स गुगल मॅप्सची विंडो बंद केल्यानंतरही शेवटचे ठिकाण सेव्ह करू शकणार आहेत. या फीचरमुळेस तुम्ही काही तासांपूर्वी शेवटी कुठे होता हे आठवायची गरज भासणार नाही. एखाद्या पिकनिकला गेल्यावर ट्रिप प्लॅन करताना जर तुम्ही मध्येच ब्रेक घेतला तरीसुद्धा तुम्ही आधी कुठे होता हे तुम्हाला कळेल; कारण ही ट्रिपच गुगल सेव्ह करणार आहे. एवढंच काय तर युजर्स एकाच वेळी अनेक ट्रिप प्लॅन करू शकतात. पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे फीचर भरपूर फायद्याचे ठरेल.

इमर्सिव्ह व्हिव (Immersive View)


लवकरच हे फीचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये, प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर करून, इमर्सिव्ह व्ह्यू फीचर अगदी वास्तवदर्शा स्थान, ठिकाणं तयार करते. यामध्ये अनेक महत्त्वाच्या माहितीचाही समावेश करण्यात आला आहे.
Comments
Add Comment

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या

शेफालीने सलमान-अक्षयच्या चित्रपटातून केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण

शेफाली जरीवाला यांनी 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटा लगा' या पॉप गाण्यामुळे अमाप लोकप्रियता मिळवली. हे गाणे