Adani Group : अदानींची रेल्वेत एन्ट्री, आयआरसीटीसीला देणार टक्कर?

Share

स्टार्क एंटरप्रायझेसचा १०० टक्के हिस्सा करणार खरेदी

मुंबई : सध्या देशातील सर्वात मोठी पोर्ट आणि एअरपोर्ट ऑपरेटर कंपनी (Airport operator company) म्हणून उद्योगपती गौतम अदानींच्या (Gautam Adani) अदानी समूहाचे नाव आहे. मात्र आता गौतम अदानी रेल्वे क्षेत्रातही (Railway) जोरदार एन्ट्री करण्याच्या तयारीत आहेत. अदानी समुहाची (Adani Group) प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस या सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. याची सुरूवात कंपनी ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग सेवेपासून करू शकते.

स्टार्क एंटरप्रायझेस (Stark Enterprises) या ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगसाठी ट्रेनमॅन प्लॅटफॉर्म (Trainman platform) चालवणा-या कंपनीचा १०० टक्के हिस्सा अदानी समूह खरेदी करणार आहे. शेअर बाजाराला (Share market) दिलेल्या माहितीनुसार, हा करार झाला असला तरी त्यासाठी काय किंमत ठरवली गेली आहे, हे समोर आलेले नाही. अधिग्रहणानंतर ही कंपनी ‘अदानी डिजिटल लॅब’ (Adani digital lab) या अदानी ग्रुपच्या उपकंपनीचा एक भाग असेल.

काय आहे ट्रेनमॅन?

आयआयटी रुरकीचे पासआउट विनीत चिरानिया आणि करण कुमार यांनी सुरुवात केलेले स्टार्क एंटरप्रायझेसचे ट्रेनमॅन प्लॅटफॉर्म हे आयआरसीटीसी (IRCTC) अधिकृत आहे. ही कंपनी सध्या गुरुग्राम येथून काम करत आहे. अलीकडेच, स्टार्क एंटरप्रायझेसनं अमेरिकन गुंतवणूकदारांकडून १० लाख डॉलर्सचा निधी उभारला. या कंपनीचे अदानी समूह अधिग्रहण करणार आहे.

काय आहे अदानी डिजिटल लॅब?

अदानी डिजिटल लॅब ही अदानी समूहाचा भविष्यातील एक बिझनेस प्लॅन (Future buisness plan) आहे. या लॅबमध्ये कंपनी ॲप डिझाइनिंग (App designing), यूजर इंटरफेस डिझाइन (User Interface Design), एसईओ (SEO), रिसर्च आणि ॲनालिसिस (Research and Analysis) यांसारखे काम करते. त्याचबरोबर या लॅबमध्ये कंपनीच्या ‘अदानी वन’ (Adani one) या सुपर ॲपवरही काम सुरू आहे.

आयआरसीटीसीला टक्कर?

ऑनलाइन ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये सध्या सरकारी कंपनी आयआरसीटीसी (IRCTC) आघाडीवर आहे. परंतु अनेक ट्रॅव्हल आणि टूर ऑपरेटर, युटिलिटी वेबसाइट देखील त्यांच्या पेजवरून तिकीट बुकिंग सेवा पुरवतात. अदानी समूहाच्या यातील एन्ट्रीमुळे आता आयआरसीटीसीला टक्कर मिळणार की काय असं चित्र दिसत आहे.

Recent Posts

Jio युजर्सला हवे Unlimited 5G डेटा, इतके रुपयांचा करावा लागेल रिचार्ज

मुंबई: जिओने आपला रिचार्ज पोर्टफोलिए अपडेट केला आहे. कंपनीने सर्व प्लान्सच्या किंमतीत बदल केला आहे.…

4 hours ago

IND vs ZIM: अभिषेक-गायकवाडचे वादळ, आवेश-मुकेशचा कहर, झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले

मुंबई: भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेला १०० धावांनी हरवले आहे. यासोबतच टीम इंडियाने पाच सामन्यांच्या…

5 hours ago

१००० कोटीहून अधिक नेटवर्थ…क्रिकेटच नव्हे तर बिझनेसमध्येही हिट धोनी

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. कॅप्टन कूल ४३ वर्षांचा झाला…

6 hours ago

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

9 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

9 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

9 hours ago