सर्वसामन्यांच्या स्वयंपाकघरातील ‘या’ महत्वाच्या गोष्टीचे दर कमालीचे घसरले!

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. यामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात तेलाचा पुरवठा वाढण्यास मदत होणार असून, त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. सरकारने रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात १७.५% वरून १२.५% पर्यंत कपात केली आहे.


दरम्यान, जागतिक बाजारातील खाद्यतेलाच्या किमती घसरल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खाद्यतेल संघटनांना प्रमुख खाद्यतेलाच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) प्रति लिटर ८ ते १२ रुपयांनी कपात करण्याचे नुकतेच निर्देश दिले होते.


हेही वाचा..


सरकारने नुकतीच खाद्यतेल उत्पादकांसोबत बैठक घेतली होती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे दर कमी करण्यास सांगितले होते. आता सरकारने आयातही स्वस्त केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. सामान्यतः 'कच्चे' सोयाबीन आणि सूर्यफूल तेल भारतात आयात केले जाते, जे नंतर देशातच शुद्ध केले जाते. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे.

Comments
Add Comment

आत्मसमर्पणासाठी नक्षलवाद्यांना हवाय १५ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ

गडचिरोली (प्रतिनिधी): नक्षल संघटनेचा वरिष्ठ नेता भूपती आणि रुपेशचे शेकडो सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण व त्यानंतर सहा

पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

आम्ही लाखो मशिदी उभारू, MIM चे असदुद्दीन ओवैसी फुत्कारले

नवी दिल्ली : जोपर्यंत हे जग आहे, जगाचं अस्तित्व आहे. तोपर्यंत मुसलमान राहणार. आम्ही लढत राहू. आम्ही लाखो मशिदी

अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी

‘आयएनएस माहे’ आज भारतीय नौदलात

मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत