Nashik : नाशिक जिल्ह्यातील 'आठ' ग्रामसेवकांवर कारवाई

तीन निलंबित, तीन बडतर्फ तर दोघांच्या सेवा समाप्ताचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय


नाशिक : जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी चौकशीअंती जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांवर कारवाई निश्चित केली आहे. त्यात तीन ग्रामसेवक निलंबित, तीन बडतर्फ तर दोन कंत्राटी ग्रामसेवकांची सेवा समाप्ताची कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या कारवाईची माहिती देण्यास जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग टाळाटाळ करीत असल्याबद्दल विभागाच्या कार्य पद्धतीवर संशय व्यक्त होत आहे.


स्थानिक पातळीवर गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग केला जात आहे. या निधीतून गावांचा विकास व्हावा या ऐवजी अनेक ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक हे सरपंचांसह पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वतःचा विकास साधत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दुरूस्तीची कामे न करताच बिले काढणे, मर्जीतील लोकांना कामे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, नोंदवह्या १ ते ३३ नोंदी अपुर्ण असणे अशा विविध प्रकारचे ठपके यापुर्वीच ग्रामसेवकांवर ठेवून अनेकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. अशाच प्रकारे कामात अनियमितता करतानाच विविध आरोपांवरून आठ ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तुत करण्यात आली आहे.


अनेक गावांत ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारीं सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विकासकामे देखील रखडली आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाहीत. त्यामुळे ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्य वाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय

लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या