Wrestler Case : पॉक्सो प्रकरणी बृजभूषण यांना क्लीन चिट!

Wrestler Case : कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का


नवी दिल्ली : भारतीय कुस्ती परिषदेचे माजी अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan) यांच्या विरोधात दाखल असलेल्या (Wrestler Case) पोक्सो गुन्ह्यात (POCSO) पोलिसांना सबळ पुरावे न मिळाल्याने, हे गुन्हे रद्द करावेत, अशी याचिका दिल्ली पोलिसांनी कोर्टात सादर केली आहे. बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी आज आरोपपत्र दाखल करण्याऐवजी क्लोजर रिपोर्ट म्हणजे तपास बंद करण्याची परवानगी कोर्टाला मागितली आहे. यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे.


बृजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत सिंह यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील या भूमिकेवर कुस्तीपटू ठाम होते. मात्र, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतले. यावेळी त्यांना न्याय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.


दरम्यान, या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस करत होते. कुस्तीपटूंना न्यायाची अपेक्षा होती. मात्र, दिल्ली पोलिसांना तपासात पोस्को गुन्ह्याबाबत सबळ पुरावा मिळाला नसल्याने बृजभूषण यांना क्लीनचीट देत या गुन्हाचा तपास बंद करण्यासाठी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.



हे पण वाचा : नवा ट्विस्ट! बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेने खोटी तक्रार केल्याची अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली


एकूण ७ कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध दोन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ६ प्रौढ महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राऊस अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर दुसरे आरोपपत्र पतियाळा न्यायालयात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आले. मात्र अल्पवयीन मुलीने लावलेल्या आरोपांमध्ये दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांना क्लीन चिट दिली आहे.

Comments
Add Comment

बलाढ्य भारताच्या तीन भूभागांवर टीचभर नेपाळचा दावा

१०० रुपयांच्या नोटेवर दाखवले भारताचे तीन भाग मुंबई : विशाल आणि बलाढ्य अशी जगाच्या नकाशावर ओळख असलेल्या

‘घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का ? ’

नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मतदार यादी पुनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर

पंतप्रधान मोदी कर्नाटक आणि गोव्याचा दौरा करणार, ७७ फुटी श्रीराम मूर्तीचे अनावरण करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार २८ नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे

भारतात ॲपल कंपनीवर होणार दंडात्मक कारवाई

नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य टेक कंपनी ॲपलला भारतात नवीन स्पर्धा कायद्यांमुळे मोठा दंड भरावा लागणा आहे. भारतीय

भारतीय क्रिकेटपटू पुजाराच्या मेहुण्याची आत्महत्या! बलात्काराचा आरोप अन् एका वर्षात जीवन संपवले, जाणून घ्या सविस्तर

राजकोट: भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंधामुळे चर्चेत आला आहे.

झुबीन गर्गची 'हत्या'च! आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधानसभेत धक्कादायक वक्तव्य

गुवाहाटी: आसामचा सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्गचा मृत्यू ही कुठलीही दुर्घटना नसून त्याची हत्या केली असल्याचा