Vande Bharat : 'यापेक्षा आमची एसटी बरी...' वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गळती?

Vande Bharat : सोशल मीडीयावर मीम्सचा मुसळधार पाऊस


मुंबई : वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये (Vande Bharat) गळती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेचा भडीमार सुरु केला असतानाच आता सोशल मीडीयावर मीम्सचाही मुसळधार पाऊस कोसळत आहे. ‘टिप टिप बरसा पानी…’, 'यापेक्षा आमची एसटी बरी...' अशा अनेक मीम्स द्वारे मोदी सरकारला ट्रोल केले जात आहे.


देशभरात सध्या १७ मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. येत्या २६ जूनला पंतप्रधान मोदी मुंबई-गोवासह आणखी ५ मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. पण अशातच एका व्हायरल व्हिडीओमुळे पंतप्रधान मोदी आणि वंदे भारत एक्स्प्रेसला मोठ्या ट्रोलिंगला सामोर जावे लागत आहे.





काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका ट्रेनच्या बोगीमध्ये पाणी पडताना दिसत आहे. एक कामगार पडणाऱ्या पाण्याखाली प्लास्टिकचे ट्रे ठेवताना दिसत आहे. तर आतमध्ये प्रवासीही बसलेले दिसतात. केरळ काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ वंदे भारत एक्स्प्रेसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. ८ सेकंदाचा हा व्हिडीओ कोणत्या ट्रेनचा आणि कधीचा आहे, याबाबत मात्र कोणतीही माहिती मिळालेली नाही.


मात्र, काँग्रेसने या व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांचे लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. मात्र, व्हिडीओबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.


दरम्यान, दक्षिण रेल्वेने मात्र ट्विट करून हे आरोप फेटाळून लावले आहेत.


“केरळमध्ये सुरू असलेल्या वंदे भारतमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही. किंवा ही घटना दक्षिण रेल्वेमध्ये चालणाऱ्या इतर दोन वंदे भारत ट्रेन सेवांमध्ये घडलेली नाही,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.


यापूर्वीही वंदे भारत ट्रेन अनेकदा वादात सापडली आहे. कधी जनावरे धडकल्याने ट्रेनच्या पुढच्या भागाचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. तर कधी दगड लागल्याने किंवा पक्षाची धडक बसल्याने काचा फुटल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. याशिवाय ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाबाबतही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी