Sharad Pawar : तरुणाचे शरद पवारांना धमकी देण्याचे कारण ऐकून डोक्याला हात लावाल!

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धमकी प्रकरणी (Sharad Pawar threat incident) एक चक्रावून टाकणारी बातमी हाती येते आहे. केवळ लग्न (Marraige) जमत नसल्यामुळे अटक करण्यात आलेल्या सागर बर्वे या तरुणाने शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. 'तुमचा दाभोलकर करू' अशी धमकी पवारांना देण्यात आली होती.


पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्यात. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही झाला होता. मात्र, 'राजकारण महाराष्ट्राचे' या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती आणि सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे तपासात समोर आले आहे.


सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली असे, सागर याने पोलिसांना सांगितले. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.

Comments
Add Comment

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,