सरस्वतीची हत्या कीटकनाशकाने झाल्याचा संशय
मीरा रोड (Crime story) : मीरा रोड येथील सरस्वती वैद्य (Sarswati Vaidya) हत्या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी मनोज साने (Manoj Sane) वेगवेगळे दावे करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असला तरी पुराव्यामधून मात्र हत्या मनोज सानेनेच केली असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले होते. मात्र हत्येपूर्वी आरोपी मनोज सानेने बोरीवलीतील नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्यानेच हे कीटकनाशक सरस्वतीला पाजून तिची हत्या केली आहे का यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.
सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेले होते. त्या ठिकाणी झालेल्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. साने आणि सरस्वती यांच्या मोबाईलची आणि सीडीआरची पोलीस आता कसून तपासणी करत आहेत.
केवळ हेच नव्हे तर आरोपी मनोज सानेच असल्याचे सांगणारा आणखी एक पुरावा आहे. मनोज सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यात मृतदेहाचे तुकडे पिशवीत गुंडाळून घेऊन जाताना कैद झाला आहे. त्याचबरोबर आरोपी मनोज साने हा मृत सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे टाकताना अत्यंत सावधगिरी बाळगत असल्याचंही सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. इमारतीची लिफ्ट सातव्या मजल्यावर थांबल्यावरच तो मृतदेहाच्या तुकड्यांनी भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडत असल्याचे या फुटेजमध्ये दिसले आहे.
संबंधित बातम्या –
मीरा रोड हत्या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल करण्याचा आरोपीचा प्रयत्न