Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Loksabha Elections 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शुक्रवारी नाशिकमध्ये घेणार जाहीर सभा

Loksabha Elections 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शुक्रवारी नाशिकमध्ये घेणार जाहीर सभा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रीय


नाशिक : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. यात भाजप मिशन ४५ यशस्वी करण्यासाठी अत्यंत वेगाने हालचाली करत आहे. नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभा घेतल्यानंतर आठच दिवसांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा शुक्रवारी नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची शक्ती ज्या भागात कमी आहे, ती वाढवण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. नांदेडनंतर आता नाशिकमध्ये आपले बळ वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने जे. पी. नड्डा शुक्रवारी सभेमध्ये काय भाष्य करतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment