Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीगुजरातमध्ये होणार होता २६/११ सारखा हल्ला, वेळीच हाणून पाडण्यात एटीएसला यश

गुजरातमध्ये होणार होता २६/११ सारखा हल्ला, वेळीच हाणून पाडण्यात एटीएसला यश

सुरत: २६/११ सारखा हल्ला गुजरातमध्ये घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवादी संघटना आयसिस खुरासान मॉड्यूलच्या ५ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसच्या पथकाने अटक केली. सुरतमधून अटक करण्यात आलेली महिला दहशतवादी सुमेराबानू हिने असा खुलासा केला आहे की, तिला सुरत कोर्टात आत्मघातकी हल्ला करण्याचे आदेश मिळाले होते.

सुमेराबानूने सांगितले की, आमच्या म्होरक्याकडून मिळालेल्या आदेशानुसार मी सुरत कोर्टात हल्ल्याची तयारी सुरू केली होती, रेकीही केली होती. फक्त कमांडरच्या आदेशाची वाट पाहत होते. पोरबंदर-सुरत येथून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा साथीदार झुबेर अहमद मुन्शी नावाच्या सहाव्या दहशतवाद्याला गुजरात एटीएसने काश्मीरमधून अटक केली आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर गुजरातमध्ये आणले जात आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणारे आणि मदत करणाऱ्यांची ओळख पटवण्याचा आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. या महिलेकडून चार मोबाइल आणि इतर डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

गुजरात एटीएसचे आयजी दीपेन भद्रन यांनी सांगितले होते की, अटक करण्यात आलेले पाच जण दहशतवादी संघटना आयसिस खोरासानच्या मॉड्यूलचा भाग आहेत. ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -