राज्यातील अनेक क्रीडासंकुलांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार!

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या तक्रारीनंतर क्रीडा संचालनालयाची कार्यवाही


मुंबई : शासनाकडून निधी घेऊनही राज्यातील अनेक क्रीडासंकुल आणि क्रीडा परिषदा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर करत नाहीत. काही क्रीडा समित्यांनी तर मागील काही वर्षांपासून लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर केलेले नाहीत. त्यामुळे यामध्ये कोट्यवधी रूपयांचा अपहार किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी याविषयी राज्याच्या क्रीडा संचालकांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन क्रीडा संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवरील क्रीडा अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांना तत्परतेने लेखे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.


जोपर्यंत लेखापरीक्षण अहवाल आणि तत्सम कागदपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत क्रीडा परिषदा, क्रीडा संकुलांना शासकीय निधी देण्यात येऊ नये, असे हिंदु विधिज्ञ परिषदेच्या वतीने अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इलकरंजीकर यांनी क्रीडा संचालकांना लिहिले होते. याची नोंद घेत क्रीडासंचालनालयाने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या तक्रारीची प्रत राज्यातील सर्व क्रीडा अधिकार्‍यांना पाठवून या सूत्रावर गांभीर्याने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.


क्रीडा संकुलाविषयी लेखापरिक्षण अहवाल अद्यावत ठेवणे, फेरफार अहवाल अथवा तत्सम कागदपत्रे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे सादर करणे याचे दायित्व विभागीय संचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी यांसह संबंधित अधिकार्‍यांचे आहे, हे राज्याचे क्रीडा संचालनालयाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व क्रीडा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले असून हिंदु विधिज्ञ परिषदेच्या पत्रानुसार कारवाई करावी ज्याचा आढावा १ मासाने घेण्यात येईल, असे कळवले आहे.



भ्रष्टाचार उघडकीस आल्यास क्रीडा आयुक्तांना आरोपी करण्याची मागणी करावी लागेल! - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर


आयुक्तांना दिलेल्या पत्रावर क्रीडा आयुक्तांनी काहीच कारवाई केली नाही आणि भविष्यात क्रीडा परिषदा किंवा क्रीडासंकुल यांमध्ये काही भ्रष्टाचार उघडकीस आला, तर कळवूनसुद्धा आयुक्तांनी लक्ष घातले नाही, यासाठी आयुक्तांनाही सहआरोपी करण्याची मागणी आम्हाला करावी लागेल, असेही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे. क्रीडासंकुले, क्रीडा परिषदा यांच्याबाबत काही भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात आल्यास आणि त्याविरोधात लढायची इच्छा असल्यास 9850859538 या क्रमांकावर संपर्क करण्याचेही आवाहन हिंदु विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे