स्वामी समर्थ बखर, रामनाम स्वामीनाम

Share

समर्थ कृपा : विलास खानोलकर

 

गोपाळबुवा केळकरांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या, ऐकून खात्री करून घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली. तीच श्री स्वामी समर्थ बखर.

गोपाळबुवा केळकर हे त्यावेळची इंग्रजी तिसरी शिकलेले होते. ते सुरुवातीस नास्तिक होते; परंतु त्यांना आस्तिक बनविण्यासाठी श्री स्वामींना वरील लीला करावी लागली. ‘नरदेही नरसिंह। प्रगटला तरू पोटी। नास्तिकाच्या कश्यपूला। आस्तिकाची देण्या गती।।’ हाच तर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा गाभा आणि हेतू आहे. गोपाळबुवांसारख्या सुशिक्षित नास्तिकाला गती देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बखरीचे लिखाण करून घेण्यासाठीच श्री स्वामींना ही लीला करावी लागली.

जीवघेण्या दुखण्याला कंटाळून बुवा निर्वाणीचे बोलले, ‘जो कोणी या जगाताचा ईश्वर असेल त्याने आठ दिवसांत माझी पोटदुखीची व्याधी दूर केली, तर उरलेल्या माझ्या आयुष्यात त्या एका भगवंताशिवाय अन्य कुणाचीही मी चाकरी करणार नाही.’ बुवांच्या या घोर प्रतिज्ञेने त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. श्री स्वामींनी बुवांची व्याधी दूर केली. आता प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबबादारी गोपाळबुवा केळकरांची होती. ती त्यांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या, अनुभवलेल्या, ऐकून खात्री करून घेतलेल्या लीलांची मोडी भाषेत बखर लिहून पार पाडली. तीच श्री स्वामी समर्थ बखर.
स्वामी म्हणे दिनरात म्हणा राम
मनात जनात कामात ठेवा राम ।। १।।
रक्ताच्या थेंबाथेंबात राहतो राम
तुमच्यासाठी राम जेव्हा म्हणेल राम ।। २।।
स्वामी नाम प्रचंड सशक्त
रामासारखे व्हा तुम्ही पितृभक्त ।। ३।।
रामासारखे व्हा तुम्ही मातृभक्त
रामासारखे व्हा तुम्ही गुरुभक्त  ।। ४।।
रामासारखे व्हा तुम्ही स्वामीभक्त
रामश्याम दत्तभक्त मातृभक्त ।। ५।।
स्वामीभक्त रामाचे पाळा नियम
पाळा एक वचनी एक बाणी नियम ।। ६।।
एक पत्नी, एक व्रती उत्तम नियम
बंधुप्रेम, देशप्रेम, प्रणी प्रेम नियम ।। ७।।
निसर्गप्रेम नदी-नाली प्रेम नियम
प्रेमवचन, पितृवचन सत्य नियम ।। ८।।
साऱ्या जगात पाना-पाण्यात राम रानावनात फुलाफळात सुगंधी राम ।। ९।।
चांगल्या कार्यात हसण्या-बोलण्यात राम
लंकादहनात रावणा मारणात राम ।। १०।।
लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सारे राम
सुग्रीव, अंगद, जांबुवंत, हनुमान सारे राम ।।११।।
नर, वानर, जटायू, खार सारे राम
सुवर्ण हरीण, विभीषण एकक्षण राम ।।१२।।
तत्काळ पूर्ण करा चांगले काम
स्वच्छ ठेवा नदी-नाले देवधाम ।।१३।।
गंगा, यमुना, जमुना, सीता, देवीधाम
भरपूर फुले, फळे, झाडे लावा काम ।। १४।।
सर्व पृथ्वीच जगवणे रामाचे काम
अणुयुद्ध टाळणे मानवजात वाचवणे काम ।। १५।।
अणुरेणुत दत्त, स्वामी एक नाम
दुःखे गोपाळबुवांची दूर केली घेता स्वामी नाम ।। १६।।
गोपाळ केळकरांच्या बखरीत स्वामी नाम
दिनरात तुम्ही घ्या राम स्वामी नाम ।। १७।।
रामनवमीला पूर्ण केली स्वामीनाम
जेथे जेथे ईश्वरनाम तेथे तेथे स्वामीनाम ।। १८।।
स्वामी वदे जन्म माझा वट वृक्षाखाली
३०० वर्षे वाढल्या पारंब्यासाली ।। १९।।
अंगावरती वारुळ १००० वर्षे झाली
शंकर पार्वती दत्त प्रसन्न झाली ।। २०।।
नाही आदि नाही अंत
लोक म्हणती हाच खरा संत ।। २१।।
करती पूजा नाही भ्रांत
सारा भूमंडळ स्वामींचा प्रांत।। २२।।
दया, क्षमा, शांती व्हा निवांत
सुखी व्हाल हा जन्म उपरांत ।। २३।।
दूर करेन भूतबाधा
दत्तप्रसन्न बसले हृदयी बघा ।। २४।।
मनी राहा दक्ष पूजा वटवृक्ष
वाढवा झाडे हजारो वृक्ष ।। २५।।
सार्या पशू पक्षांत आहे स्वप्न
ब्रह्मा विष्णू महेश माझेच स्थान।।२६।।

vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

25 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

26 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

34 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

37 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

46 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

49 minutes ago