मणिपूरमध्ये हिसांचाराचा कहर! आई आणि चिमुकल्याला जिवंत जाळले

उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जात असताना रुग्णवाहिका पेटवून दिली


इंफाळ: मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये हिंसक जमावाने तीन जणांना जिवंत जाळले. यामध्ये आई आणि मुलाचाही समावेश आहे. तिघेही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जात होते. वाटेत २ हजार लोकांच्या जमावाने हल्ला करून गाडी पेटवून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीनंतर राखेतून फक्त हाडेच आढळून आली आहेत.


ही घटना रविवारी घडली असली तरी त्याची संपूर्ण माहिती दोन दिवसांनी समोर आली आहे. टोन्सिंग हँगिंग (७ वर्ष), त्याची आई मीना हँगिंग आणि त्याची नातेवाईक लिडिया लॉरेम्बम अशी मृतांची नावे आहेत.


या तिघांनी ३ मे पासून इंफाळच्या पश्चिमेला सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या कांगचुप येथील आसाम रायफल्सच्या छावणीत आश्रय घेतला होता. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आसाम रायफल्सच्या कॅम्पमध्ये अनेक कुकी कुटुंबे राहत आहेत. अधूनमधून बाहेरून गोळीबार होत असून मेईतेई समुदायातील लोक कुकी राहत असलेल्या भागांना लक्ष्य करतात. रविवारी अशाच एका हल्ल्यात एका मुलासह तीन जण जखमी झाले.


यानंतर शिबिराच्या अधिकाऱ्यांनी इंफाळ पश्चिमचे एसपी इबोमचा सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि पीडितांना इंफाळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. सायंकाळी ५.१६ वाजता रुग्णवाहिका आणि परिचारिका एसपींच्या देखरेखीखाली शिबिरातून निघाली. आसाम रायफल्सचे कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.



एसपींसमोरच रुग्णवाहिका पेटवून देण्यात आली


रुग्णवाहिका नुकतीच अर्ध्या वाटेवर पोहोचली होती, तेव्हा हिंसक जमावाने वाहनाला धडक दिली. आसाम रायफल्सच्या सूत्रांनी सांगितले की त्यांना रविवारी संध्याकाळी नंतर कळले की एसपींच्याच समोर ती रुग्णवाहिका जाळण्यात आली. चालक आणि परिचारिका घटनास्थळावरून पळून गेले.


या आगीत मृत्युमुखी पडलेली आई मेईतेई समाजातील असून तिचे लग्न कुकी समाजातील व्यक्तीशी झाले होते. मृताचे नातेवाईक पावलेनलाल हँगिंग म्हणाले, आम्ही ३ मे पासून मेईतेई समुदायाकडून अत्याचाराला सामोरे जात आहोत. पण रविवारची घटना सर्वात भीषण होती.

Comments
Add Comment

Public Interest Litigation : एका पोस्टकार्डने बदलली भारतीय न्यायव्यवस्था; जनहित याचिकेचा (PIL) इतिहास आणि सद्यस्थिती

भारतीय न्यायव्यवस्थेचा इतिहास पाहताना अनेक कायदेशीर खटले, मोठे कायदे आणि वकिलांच्या युक्तिवादांची चर्चा होते.

OpenAI Astra AI : मानवी मेंदूलाही न जमलेले काम AI ने करून दाखवले! OpenAI च्या 'Astra' मॉडेलने सोडवली १० जुनी कठीण कोडी

वॉशिंग्टन : तंत्रज्ञानाच्या जगात क्रांती घडवणाऱ्या OpenAI या प्रसिद्ध कंपनीने एक अत्यंत महत्त्वाचा दावा केला आहे.

Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंच्या

Shocking Crime News : "आंब्याच्या बागेत ओढणीने गळफास अन्..." २ चिमुकल्या बहिणींच्या मृत्यूचं 'ते' काळं सत्य अखेर समोर!

उत्तर प्रदेश : ज्या हातांनी कौतुकाने कुरवाळायला हवे होते, ज्या बापाच्या कुशीत सुरक्षिततेचा निवारा मिळायला हवा

Taslima Nasreen : जंतर-मंतरवरील आंदोलनाची बांगलादेशातील घडामोडींशी तुलना; तस्लीमा नसरीन यांचे वक्तव्य

बांगलादेशातून हद्दपार झालेल्या लेखिका तस्लीमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या (CJP)

Kangana Ranaut Slams Hrithik Roshan : आगीत तेल ओतू नकोस..."; कंगना रनौतचा हृतिकवर जोरदार पलटवार! थेट गर्लफ्रेंड सबा आझादचा उल्लेख करत म्हणाली...

मुंबई : बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त आणि गाजलेल्या वादांपैकी एक असलेल्या कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि हृतिक रोशन (Hritik Roshan)