आता पिंपरी-चिंचवडचे नावही बदलण्याची मागणी

भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून शहरात शंभरहून अधिक पोस्टर्स


पिंपरी-चिंचवड : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शहरे, महामार्गांना महान व्यक्तिमत्त्वांची नावे दिली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आले. तसेच औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव तर वांद्रे-वरळी सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. यातच आता पिंपरी - चिंचवड शहराचं नाव बदलून 'जिजाऊनगर' ठेवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भक्ती शक्ती प्रतिष्ठानने ही मागणी केली आहे. शहरातील विविध भागात पिंपरी-चिंचवड शहराचे जिजाऊ नगर नाव करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे. तशा आशयाचे शंभरहून अधिक पोस्टर्स पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि मिस कॉल द्या अशी मोहिम राबवण्यात आली आहे.


पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलण्याची चर्चा या अगोदर २००६ -०७ ला झाली होती. तशा बातम्या देखील छापून आल्या होत्या. पण स्थानिकांनी पिंपरी- चिंचवड शहराचे नाव बदलण्यास विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शहराचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यामुळे शहरात नामकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका