पदांवरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भरला दम

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीची आठ मतदारसंघांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यानंतर तिकीटांवरुन भांडणा-या कार्यकर्त्यांची अजित पवारांनी हजेरी घेतली.


पदांवरुन वाद घालणार्‍या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी त्यांच्या शैलीत चांगलंच खडसावलं. ते म्हणाले, "पदांवरुन कोणीही भांडायचं नाही, नाहीतर एकेकाच्या कानाखाली आवाज काढेन. हा कुठला फाजीलपणा आहे? यातून तुमची नाही तर आमची आणि पवारसाहेबांची बदनामी होते." याचवेळी जर असं वागलात तर मी अत्यंत टोकाची भूमिका घेऊन पदाचा राजीनामा देईन असा अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दम भरला.


लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्याचं काम राष्ट्रवादीने सुरु केलं आहे. प्रत्येक मतदारसंघात कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे हे विचारात घेऊनच महाविकास आघाडीत जागावाटप केलं जाईल, असं सध्या या आघाडीचं सूत्र आहे. या चाचपणीसाठीच आजची आढावा बैठक घेण्यात आली व त्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांना अजित पवारांनी चांगलीच समज दिली.

Comments
Add Comment

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर