चिरंजीवींना कॅन्सर झाल्याच्या केवळ अफवा

हैदराबाद : समाजमाध्यमांवर अफवा काही सेकंदात व्हायरल होतात. एखादा सेलिब्रिटी जीवंत असतानाच समाजमाध्यमांवर त्याच्या निधनाची बातमी आल्याने चाहते शहानिशा न करता लगेच श्रद्धांजली वाहायला लागतात. अशीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीविषयी त्याला कॅन्सर झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र ही गोष्ट चुकीची असल्याची माहिती खुद्द चिरंजीवी यांनी ट्विट करत दिली.


चिरंजीवीने ट्विट केलं आहे की,"गेल्या काही दिवसांपूर्वी कॅन्सर सेंटरचं उद्घाटन करताना मी म्हणालो होतो की, कॅन्सरबद्दल जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या तर तुमचा बचाव होऊ शकतो. त्यामुळेच मी कोलन स्कोप चाचणी केली. या चाचणीत नॉन-कॅन्सरस पॉलीप्सचं निदान झालं आणि नंतर ते काढण्यात आलं. त्यावेळी मी एवढचं म्हणालो होतो की,त्यावेळी चाचणी केली नसती तर कॅन्सर झाला असता. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करुन घेतली पाहिजे".





त्यांच्या आधीच्या ट्विटबद्दल गैरसमज करुन घेत चुकीची माहिती पसरवल्याने चाहते घाबरले व दुखावले गेले. चिरंजीवी यांच्याबाबत असे समोर आले होते की त्यांना कॅन्सर झाला होता आणि उपचारानंतर कॅन्सर बरा झाला. मात्र या सर्व अफवा असल्याचे चिरंजीवी यांच्या पोस्टमधून स्पष्ट होत आहे. अशी अफवा पसरवणाऱ्यांबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.


अफवांमुळे माझ्या अनेक हितचिंतकानी मला चांगल्या आरोग्यासाठी मेसेज पाठवले, त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी हे स्पष्टीकरण दिल्याचे चिरंजीवी यांनी म्हटले. तसेच विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणे काहीही लिहू नका असे आवाहन त्यांनी माध्यमांना केले आहे.


चिरंजीवी हे लवकरच 'भोला शंकर' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मेहेर रमेश यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा ॲक्शनपट असेल. यामध्ये तमन्ना आणि किर्ती सुरेश यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Comments
Add Comment

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय