अहमदाबाद : टाटा समूह गुजरातमध्ये १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि १३ हजाराहून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
टाटा समूहाने गुजरात सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने गुजरात सरकारसोबत हा करार केला आहे.
प्रस्तावित गीगा कारखाना हा भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना असेल. पहिल्या टप्प्यात सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह कंपनी येथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या सामंजस्य करारावर अग्रतास एनर्जी स्टोअरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ विजय नेहरा आणि गुजरात सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…