वाकोल्यात उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने चिमुकलीचा मृत्यू तर चिमुकला जखमी

मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आणि विकासकाच्या बेजबाबदारपणामुळे पदपथाच्या दिव्याच्या उघड्या वीजवाहिनीचा शॉक लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सांताक्रूजमधील वाकोला येथे घडली. याच दुर्घटनेत पाच वर्षांचा चिमुकला जखमी झाला आहे. त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


वाकोल्यातील चैतन्यनगर येथे काल (२ जून) रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत तेहरीन इफ्तिकार या सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तर तनिष शिंदे हा पाच वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.


हे दोघेही काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला खेळत होती. ज्या ठिकाणी ते खेळत होते तिथे एक पथदिवा आहे. त्याची वीज वाहिनी मोकळीच होती. खेळता खेळता या मुलांचा स्पर्श वीज वाहिनीला झाला आणि दोन्ही मुले खाली कोसळली. जखमी अवस्थेत त्या मुलांना स्थानिकांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान तेहरीन इफ्तिकारचा मृत्यू झाला.


दरम्यान, या घटनेची पूर्ण जबाबदारी अदानी इलेक्ट्रिसिटीच्या अधिकाऱ्यांची आणि बाजूला काम सुरु असलेल्या विकासकांची आहे. त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी संतप्त स्थानिक नागरीकांनी केली आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिका मालमत्तांच्या कागदी नोंदी, कोट्यवधी रुपयांचा बुडताे महसूल

- मालमत्तांसाठी केंद्रीकृत डिजिटल नोंदणी, जीआएस आधारीत प्रणाली करा विकसित - भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी

DCM Eknath Shinde : ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तत्काळ हटवून स्ट्रक्चरल ऑडिट करा

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; होर्डिंग दुर्घटनेची घेतली गंभीर दखल मुंबई : ठाण्यात सोमवारी घडलेल्या

BMC : झाडांच्या छाटणी कंत्राट कामावरून उद्यान विभागाची मनसेने काढली सालटी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांमध्ये झाडांची पडझड सुरु असून वारंवारच्या झाडांच्या

Corporator Sonam Jamsutkar : महापालिकेची धरणे, जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये मुलांच्या सहली आयोजित करा

- भावी पिढीला पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी नगरसेविकेने केली ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी मुंबई (विशेष

Preeti Satam : प्रसुतीगृहांचा दर्जा माता व बाल रुग्णालयांसारखा करा

- प्रसुतीसह नवजात आणि बालकांवरील उपचारही प्रसुतीगृहांमध्ये उपलब्ध करा - भाजप नगरसेविका प्रिती सातम यांची

Mayor Ritu Tawde : मॅनहोल सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' प्रतिकृतीची महापौर रितू तावडे आणि नगरसेवकांनी केली पाहणी

- कुर्ला एल विभागामध्ये प्रायोगिक तत्त्वावर चाचपणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील मॅनहोल्सवर कामे करताना