Preeti Satam : प्रसुतीगृहांचा दर्जा माता व बाल रुग्णालयांसारखा करा

- प्रसुतीसह नवजात आणि बालकांवरील उपचारही प्रसुतीगृहांमध्ये उपलब्ध करा


- भाजप नगरसेविका प्रिती सातम यांची ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रसुतीगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. परंतु या सर्व ठिकाणी केवळ प्रसुतीचीच सुविधा दिली जात असल्याने छोट्या बालकांवर उपचाराची सुविधा मिळत नाही. त्यामुळे महिलांसह छोट्या बालकांवरील उपचारांची सुविधा या एकाच ठिकाणी प्रसुतीगृहांमध्ये मिळावी याकरता महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व प्रसुतिगृहे व बाल चिकित्सा केंद्रे एकाच ठिकाणी निर्माण करुन त्याची दर्जोन्नती करण्यात यावी तसेच, माता व नवजात तथा लहान बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन 'माता व बाल रुग्णालय' अशी आरोग्यविषयक यंत्रणा प्रसुतीगृहांमध्येच कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी भाजप नगरसेविका प्रिती सातम (Preeti Satam) यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका सभागृहात केली आहे.


मुंबई महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करताना भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी असे नमुद केले की, मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील २९ प्रसुतिगृहांमध्ये प्रामुख्याने गर्भवती महिलांची प्रसूती सेवा उपलब्ध करुन दिली जाते. मात्र, आजच्या काळात प्रसूती नंतर नवजात बालकांमध्ये जन्मतः आढळून येणारे आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार अशाप्रकारच्या इतर आजारांवर वेळेवर निदान करुन त्यांच्यावर तातडीच्या योग्य उपचाराकरिता तसेच बालरोगतज्ज्ञांची सेवा, नवजात अतिदक्षता विभाग, लसीकरण, पोषण सल्ला आणि माता-बालक आरोग्याच्या सर्वसमावेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. (Preeti Satam)



मात्र, अनेक प्रसुतिगृहांमध्ये प्रसूतीनंतर नवजात बालक आजारी पडल्यास त्याला उपचारार्थ दुसऱ्या लांब पल्ल्याच्या महापालिका रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात हलवावे लागते. त्यामुळे बालकास त्वरित उपचार मिळण्यास विलंब होतो. पर्यायाने, पालकांची आर्थिक, मानसिक व शारीरिक गैरसोयही होते. एकाच छताखाली माता आणि बालकांसाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यास त्वरित अधिक परिणामकारक उपचार प्राप्त होऊन सर्वसामान्य नागरिकांसही वेळीच मदत मिळण्यास सुलभ होईल. याकरता, महानगरपालिकेच्या सर्व प्रसुतिगृहांकरिता मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, बालरोग विभाग, नवजात अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या उपचार सुविधा व इतर दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असून, केवळ या सुविधा प्रसुतिगृहापुरत्याच मर्यादीत न राहता या सर्व प्रसुतिगृहाचे रुपांतर 'माता व बाल रुग्णालय' यामध्ये करणे आवश्यक आहे,असे म्हटले अाहे. (Preeti Satam)



त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व प्रसुतिगृहे व बाल चिकित्सा केंद्रे एकाच ठिकाणी निर्माण करुन त्याची दर्जोन्नती करणे. तसेच, माता व नवजात तथा लहान बालकांसाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन 'माता व बाल रुग्णालय' अशी आरोग्यविषयक यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. जेणेकरुन, गरोदर महिलांसह नवजात बालक तसेच छोट्या बालकांच्या आरोग्याबाबतचे सर्व उपचार एकाच छताखाली मिळू शकतील आणि मातांना आपल्या बालकांच्या वैद्यकीय उपचारासाठी इतर ठिकाणी फिरण्याची गरज भासणार नाही ,असेही नमुद केले आहे. (Preeti Satam)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून